कोयनेचे पाणी मुंबईला आणण्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही - मंत्री गिरीश महाजन

वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वळवण्याची योजना

मुंबई : कोयना धरणातील पाणी मुंबईला वळवले जात असल्याच्या आरोपांवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईसाठी सातारा किंवा सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी घेतले जात नसून, कोयना जलविद्युत प्रकल्पात वीज निर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे समुद्रात वाहून जाणारे पाणी मुंबईकडे वळवण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर आरोप करण्यापूर्वी आमदार रोहित पाटील यांनी अभ्यास करावा, असा सल्लाही महाजन यांनी दिला.


मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मंत्री महाजन म्हणाले, २०१४ ते २०१९ या काळात कोकणातील प्रकल्पांची चौकशी सुरू असताना मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी कोयनेच्या पाण्याचा पर्याय विचाराधीन होता. कोयना येथे जलविद्युत प्रकल्प असून, वीज निर्मितीनंतर पाणी समुद्रात जाते. या पाण्याचा पुढे अन्य कोणताही उपयोग होत नसल्याने ते मुंबईला आणण्याचा विचार करण्यात आला होता. या प्रक्रियेत मार्गावरील औद्योगिक वसाहतींनाही पाणी देण्याचे नियोजन होते. लोटे औद्योगिक वसाहतीला सध्या पाव टीएमसी पाणी दिले जाते. उर्वरित पाणी मुंबईला आणण्याची ही जुनी योजना असून, तिला पुन्हा चालना देण्याचा विचार असल्याचे महाजन यांनी सांगितले.






‘आपण सातारा, सांगली किंवा कोयना धरणातील पाणी घेत नाही. वीज निर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून समुद्रात जाणारे पाणीच वळवण्याचा विचार आहे. त्यामुळे कोणाच्याही हक्काचे पाणी घेतले जात नाही. या विषयाची माहिती घेऊन परिस्थिती समजून घेतली पाहिजे. रोहित पाटील यांनीही थोडा अभ्यास करावा,’ असे महाजन म्हणाले. या योजनेबाबत कोणाच्या मनात शंका असल्यास बैठक घेण्याची तयारी असून, त्यामध्ये संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबाला सुरतमध्ये कालव्यात ढकलून दिल्याच्या घटनेबाबतही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ही गंभीर घटना असून, एका मुलाने वाचल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याचे समजले आहे. कुटुंब बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून, नेमकी घटना काय घडली याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, मुख्यमंत्र्यांच्या कानावरही हा विषय घालणार असल्याचे महाजन म्हणाले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. बारा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, नऊ ठिकाणी लढत होत आहे. या ठिकाणी विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.

Comments
Add Comment

NCMC Smart Card : एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा; प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत

मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! 42 लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य, नर्मदा-तापी वळण योजनेला 5548 कोटींची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत

Pune Shivajinagar Court Firing : चार दिवसांपूर्वी जामीन, आज कोर्टाबाहेर हत्या! पुण्यात गोळीबाराने खळबळ

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर परिसरात कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ

Constitution Day: संविधान दिन विशेष! आजच्या Gen Z पिढीला माहीत आहेत का संविधानातील मूलभूत अधिकार?

भारतामध्ये दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना; गोळीबारानंतर कोयत्याने एकावर हल्ला

Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील आणखी दोन स्थानकं खुली; कधीपासून प्रवास करता येणार?

पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना वाहतूक कोंडीतून मेट्रोच्या पिंक