Tuesday, October 6, 2026

सणासुदीच्या काळात 'भेसळयुक्त, असुरक्षित उत्पादनांची' विक्री रोखण्यासाठी देशभरात अन्नसुरक्षा मोहीम तीव्र करण्याचे FSSAI आदेश

नवरात्री आणि दिवाळी या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर, देशभरात मिठाई, नमकीन, पेये, खाद्यतेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ (जसे की तूप, खवा, पनीर इत्यादी) आणि इतर खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येते. या पार्श्वभूमीवर, 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI) भेसळयुक्त, बनावट आणि असुरक्षित खाद्यपदार्थांची (उदा. दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, स्नॅक्स व नमकीन, पापड/फ्रायम्स, खाद्यतेल, पेये आणि तूप इत्यादी) विक्री रोखण्यासाठी अधिक कडक देखरेख आणि अंमलबजावणीच्या आवश्यकतेवर भर देत आहे. तसेच, संबंधित क्षेत्रांमधील खाण्याच्या सवयी आणि खाद्यपदार्थांची लोकप्रियता यांनुसार या पदार्थांची निवड किंवा प्रकार बदलू शकतात.

ही बाब लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, आपल्या अधिकारक्षेत्रातील अंमलबजावणी अधिकाऱ्यांना (नियुक्त अधिकारी/अन्न सुरक्षा अधिकारी/केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी) सणासुदीच्या काळात त्यांच्या संबंधित क्षेत्रांत तपासणी आणि नमुने घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती FSSAI यांनी केली आहे. या मोहिमा विशेषतः आपल्या अधिकारक्षेत्रातील 'हॉट स्पॉट्स' आणि संवेदनशील ठिकाणांवर केंद्रित असाव्यात.

याव्यतिरिक्त, जिथे 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' (FSWs) उपलब्ध आहेत, तिथे त्यांचा धोरणात्मक वापर प्रमुख बाजारपेठांमध्ये किंवा विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे केला जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे. यामुळे सणासुदीच्या काळात जागेवरच अन्नपदार्थांची तपासणी करणे, देखरेख अधिक कडक करणे, जनजागृती करणे आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांची खात्री देऊन त्यांचा विश्वास वाढवणे शक्य होईल. तसेच, तपासणी, नमुना संकलन आणि त्यांचे निष्कर्ष यांशी संबंधित माहिती 'FoSCOS' किंवा 'FOSCORIS' प्रणालीवर 'रिअल-टाइम' तत्त्वावर (म्हणजेच घडलेल्या घटनेच्या वेळीच) अद्ययावत किंवा नोंदवणे अनिवार्य असेल, असे FSSAI ने सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >