
भारतीय जनता पक्षाने शनिवारी आपल्या ओबीसी मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर केली. पक्षाने X प्लॅटफॉर्मवर ही यादी शेअर करत सर्व नियुक्त्यांची माहिती दिली. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय मंत्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री, मीडिया संयोजक, सोशल मीडिया संयोजक, नीती आणि संशोधन संयोजक, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य अशा विविध पदांवर नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चासाठी एकूण ७ राष्ट्रीय उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यामध्ये आसाममधून जोगेन मोहन, ओडिशामधून ममता मोहंता, उत्तर प्रदेशमधून संगम लाल गुप्ता, महाराष्ट्रातून बबनराव रावजी चौधरी, दिल्लीतून सत प्रकाश राणा, बिहारमधून डॉ. अर्जुन साहनी आणि उत्तर प्रदेशमधून संगीता बलवंत बिंद यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामंत्री पदावर दिल्लीचे गजेंद्र यादव, कर्नाटकचे प्रमोद मध्वराज आणि छत्तीसगडचे ललित चंद्राकार यांची नियुक्ती झाली आहे. तर राष्ट्रीय मंत्री म्हणून गुजरातचे दशरथजी ठाकोर, तामिळनाडूचे टी. वरथराजन, झारखंडचे संजीव कुमार उर्फ बबलू भगत, हरियाणाच्या सरिता जांगिड, तेलंगणाचे कडगंची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पवार आणि बिहारचे भीम कुमार साहू यांना जबाबदारी देण्यात आली आहेयाशिवाय उत्तर प्रदेशचे राधेश्याम यादव यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष, दिल्लीचे संजय कुमार गुर्जर यांना राष्ट्रीय कार्यालय मंत्री, तर डॉ. अरुण यादव यांना सह-कार्यालय मंत्री करण्यात आलं आहे. बिहारचे अजय गुप्ता मीडिया संयोजक, दिल्लीचे परीक्षित डागर सोशल मीडिया संयोजक आणि मध्य प्रदेशचे प्रदीप माहौर सोनी सोशल मीडिया सह-संयोजक असतील.
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin द्वारा निम्नलिखित सदस्यों को भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किया गया है। https://t.co/eA7HqyuxgC
— BJP (@BJP4India) November 21, 2026
भाजपने ओबीसी मोर्चासाठी ३७ राष्ट्रीय कार्यसमिती सदस्यही जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून राहुल गोविंद केंद्रे, मुंबईतून हर्षदा फरांदे आणि डॉ. स्मिता आर. काळे यांचा समावेश आहे. याशिवाय अंदमान-निकोबारमधून संजीव रंगैया, आंध्र प्रदेशमधून श्रीनिवास राव, बिहारमधून राजीव रंजन, दिल्लीतून श्वेता सैनी, गोव्यामधून शशिकांत सावंत, हरियाणामधून अवनीत कौर, पंजाबमधून राजिंदर बिट्टा, राजस्थानमधून जगदीश देवासी यांच्यासह अनेक राज्यांतील नेत्यांना स्थान मिळालं आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ओडिशाचे प्रो. अद्वैत चरण गणनायक, दिल्लीचे युजवेंद्र सिंह चहल आणि उत्तर प्रदेशच्या अधिवक्ता सीमा समृद्धी कुशवाहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला बळकट करण्यासाठी ही नवी टीम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे.






