Tuesday, October 6, 2026

Mumbai Pollution : जनरेटरमुळे वाढणारे प्रदुषणही कमी करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सखल भागांमधील पावसाचा तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने बनवण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनकरता मोठ्याप्रमाणात डिझेलवर आधारीत जनरेटरचा वापर करण्यात येतो. या डिझेलवर आधारीत जनरेटरमुळे प्रदुषणाचा धोका वाढत असल्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ (एमपीसीबी) यांच्या निकषांनुसार याठिकाणी आता प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे.

पंपिंग स्टेशनच्या जनरेटरवर प्रदुषण नियंत्रण प्रणाली बसवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सखल भागांमधील पावसाचा तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने बनवण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनकरता मोठ्याप्रमाणात डिझेलवर आधारीत जनरेटरचा वापर करण्यात येतो. या डिझेलवर आधारीत जनरेटरमुळे प्रदुषणाचा धोका वाढत असल्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ (एमपीसीबी) यांच्या निकषांनुसार याठिकाणी आता प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्यात येणार आहे.

पर्यावरण, बन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमानुसार , हवेची गुणवत्ता हळूहळू खालावत चालली आहे. या विहित राष्ट्रीय मानके न पाळल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होणे, कृषी उत्पादनात घट आणि परिसंस्थेचे नुकसान होणे यांसारख्या समस्या उद्धभवतात. एनसीएपीमधील एक प्रमुख कृती-मुद्दा म्हणजे डिझेल आधारीत जनरेटवर उत्सर्जन नियंत्रण उपकरण बसवणे आवश्यक आहे. उत्सर्जन नियंत्रण उपकरण हे डीजी सेट च्या धुरातील सूक्ष्म कण , कार्बन मोनोऑक्साईड आणि हाईड्रोकार्बन्स कमी करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे: ज्याची 'सूक्ष्म कण' उत्सर्जन पकडण्याची क्षमता कमीत कमी ७० टक्के असणे आवश्यक आहे.

उत्सर्जन नियंत्रण उपकरण हे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थाद्वारे प्रमाणित केले जातात. अशाच प्रकारच्या यंत्रणा मुंबई महानगरपालिकेच्या विविध वार्ड कार्यालय इमारती आणि रुग्णालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. फिल्टर नसलेले तंत्रज्ञान डिझेल जनरेटरच्या कार्यात कोणताही अडथळा आणत नाही. स्थिर कार्यपद्धती डिझेल जनित्र सुरू झाल्यापासूनच योग्य प्रकारे कार्य करते. सायलेन्सर डिझेल जनित्रच्या आवाजाची पातळी नियंत्रित ठेवतो. फिल्टर नसलेले तंत्रज्ञान नगण्य बँक प्रेशर प्रदान करते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे काम हाती घेण्याबाबत तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या कामाची आर्थिक तरतूद करण्याबत अति. आयुक्त (पूर्व उपनगरे) यांची यापूर्वीच तत्वतः मंजुरी घेण्यात आली आहे. "महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या निकषांनुसार पर्जन्य जलवाहिन्या उदंचन केंद्रातील डिझेल जनित्रास प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या निविदेत जे.के इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी २३.०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सन २०५० पर्यंत मुंबईला निव्वळ शून्य आणि हवामान लवचिक बनवणे, शाश्वत मार्गाकडे न्याय्य संक्रमण, समावेशक आणि परिवर्तनकारी हवामान उपायांमध्ये गुंतवणूक आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मजबूत प्रशासन स्वीकारणे यावर लक्ष केंद्रित करणे हे ध्येय असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

पंपिंग स्टेशन आणि डिझेल आधारीत जनरेटरची क्षमता

ब्रिटानिया पंपिंग स्टेशन : ४९५० के.व्ही.ए

लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशन : ९००० के.व्ही.ए

क्लीव्ह लँड पंपिंग स्टेशन : ६००० के.व्ही.ए

गझधरबंध पंपिंग स्टेशन : ६७५० के.व्ही.ए

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >