मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'महा गणेशमूर्ती कार्यशाळे'मध्ये हजारो विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतः शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती साकारली होती. या कार्यक्रमाचे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवण्यात आले आहे. नाव नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयामध्ये ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा 2026’मधील विक्रमाचे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.
मुंबई: काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केला जात असल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी ...
शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या वतीने 10 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित या कार्यशाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात आले. या कार्यक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड’कडून ‘गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदवण्यात आले. प्रमाणपत्र प्रदान करताना, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा 2026’ चे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई: मंत्रालयामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक ...
महाराष्ट्र राज्य आणि देशातील गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. काळानुरूप या सणामध्ये बदल होत गेले. पूर्वी पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर केला जायचा. पण कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांमुळे जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हेच प्रदुषण लक्षात घेऊन आता सरकारने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने आयोजित केलेल्या ह्या महागणेश मुर्ती कार्यशाळेसाठी वाशीतील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ठाणे, पनवेल, खारघर, उलवे, मुंबई आणि नवी मुंबई या परिसरातून हजारो विद्यार्थी आणि नागरिक एकत्र येऊन शाडूच्या किंवा मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा हा उपक्रम पार पडला. तज्ज्ञ मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या होत्या. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक मूर्तींचा हा संदेश घराघरांपर्यंत आणि मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.