मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत OBC समाजाच्या मागण्यांवर चर्चा, सरकारकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

मंत्रालयामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

मुंबई: मंत्रालयामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये वसतीगृहांची व्यवस्था करावी यासाठी आणखीन नवीन 100 वस्तीगृहे बांधण्यात यावे, अशी उपसमितीच्या सदस्यांकडून मागणी करण्यात आली. सोबतच, विभागीय स्तरावरील वसतीगृहांची संख्या एक हजारापर्यंत वाढवावी, महाज्योतीला एक हजार कोटी रुपये द्यावे शिवाय, मेंढपाळ, वनवासी आणि अठरापगड जातीतील लोकांच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात अशा मागण्या उपसमितीसमोर मांडण्यात आल्या.



उपसमितीच्या बैठकीतील सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बैठकीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, ॲड. मंगेश ससाणे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते.



ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून विजय वडेट्टीवार यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. वसतिगृहे खाजगी तत्त्वावर न चालवता त्या शासनाच्या संबंधित विभागानेच चालवावीत आणि सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाच्या वसतिगृह आणि इतर शैक्षणिक सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी सुद्धा वडेट्टीवारांनी मागणी केली. शासकीय योजनांचा लाभ अकरावीपासून थेट मिळावा आणि विद्यार्थ्यांना भविष्य निर्वाह भत्ता लागू करावा, अशी मागणी देखील समितीने केली. व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, लोकसंख्येच्या प्रमाणात फेलोशिपच्या जागा वाढवाव्यात आणि 'महाज्योती' या संस्थेला किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी समान न्यायाची भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली


 


वसतिगृहांसाठी जागा उपलब्ध करण्याबाबतही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या नऊ ठिकाणी जागा मिळाल्या असून, दुग्धविकास विभागाच्या 13 व अन्य ११ जागा, तसेच महसूल विभागाच्या १६ जागा वसतिगृहांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. तसेच, कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये तातडीने जागा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत, याबाबतही बैठक आयोजित करण्याच्या सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी केल्या. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर ॲड. मंगेश ससाणे यांनीही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. बाठिया कमिशनच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीच्या 22,000 जागा कमी झाल्याने ओबीसींचे सात ते आठ टक्के आरक्षण कमी होण्याची भीती आहे, त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने रिव्ह्यू घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.



यासोबतच ओबीसी आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, 'राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता' अभियान वर्षभर राबवावे आणि कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा, असे ससाणे म्हणाले. लक्ष्मण हाके यांनीही उपसमितीसमोर आपल्या मागण्या मांडताना, ओबीसी महामंडळे केवळ कागदोपत्री न ठेवता ती तातडीने प्रत्यक्ष कार्यान्वित करावीत, अशी आग्रही मागणी केली. मंत्री गणेश नाईक यांनी सर्व जातींना समान निधी देण्यात यावा आणि अगोदरचा सर्व अनुशेष (बॅकलॉग) भरून काढल्यानंतरच पुढील नियोजन करावे, अशी भूमिका मांडली. बैठकीच्या शेवटी मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात म. फुले यांचा वाडा आणि त्यापासून 300 मीटर अंतरावर असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संरक्षित स्मारक यांना जोडण्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी केली. तसेच, शासकीय नोकरभरतीमध्ये ओबीसी समाजाची भरती अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत, सर्व विभाग प्रमुखांना या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

Comments
Add Comment

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात राज्य सरकार ॲक्शन मोडवर, टास्क फोर्स सक्रिय

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केला जात

Nitesh Rane: 'श्रीवर्धन- दिवेआगर- हरिहरेश्वर' पर्यटन सर्किटचा विकास होणार, मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या प्रमुख पर्यटनस्थळांना एकत्रितपणे जोडून

FDA Action: एफडीए प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबईमध्ये 94.45 लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

मुंबई: एपीएमसी तुर्भे फळ बाजारात इथेफॉनने कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळीवर अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत

दुष्काळ निवारणासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये; पाणी, चारा अन् कर्जाबाबत मोठे निर्णय

शहरी व ग्रामीण भागात १० टक्के पाणीकपात लागू करण्यासोबतच, शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर

‘सीएम सृष्टी’ योजना राबविण्यास मंजुरी

- संशोधनाला चालना; वडार समाजाच्या खनिज उत्खनन मर्यादेत वाढ मुंबई : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय

पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता साहसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शौर्याची