Nashik : नाशिक महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, विरोधकांकडून एकही अर्ज नाही

Nashik : नाशिक महानगरपालिकेतील पाच महत्त्वाच्या विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदांच्या निवडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी (६ ऑक्टोबर) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत विरोधकांकडून एकाही पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी होणारी निवड प्रक्रिया केवळ औपचारिक ठरणार आहे. सत्ताधारी भाजपने निश्चित केलेल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार पाचपैकी तीन समित्यांची सभापतीपदे भाजपकडे, तर दोन सभापतीपदे मित्रपक्षांना देण्यात आली आहेत.



महिला व बालकल्याण समितीवर भाजपचे वर्चस्व


महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या अॅड. कोमल मेहरोलिया यांनी, तर उपसभापतीपदासाठी चित्रा तांदळे यांनी अर्ज दाखल केला आहे. विरोधकांकडून अर्ज नसल्याने या दोन्ही पदांवर भाजपचेच उमेदवार विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपसभापतीपदासाठी भाजपचे जयंत जाचक रिंगणात आहेत. सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार या समितीचे सभापतीपद मित्रपक्षाला देण्यात आले आहे.



आरोग्य समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे


वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या डॉ. पूनम महाले यांनी अर्ज दाखल केला आहे. उपसभापतीपदासाठी भाजपचे सतीश निकम यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे सभापतीपद शिवसेनेकडे , तर उपसभापतीपद भाजपकडे जाणार आहे. विधी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपच्या जुई शिंदे यांनी, तर उपसभापतीपदासाठी अंकिता शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे.शिक्षण समितीच्या सभापतीपदासाठी प्रा. शरद मोरे, तर उपसभापतीपदासाठी सोनाली भंदूरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही समित्यांवरही सत्ताधारी गटाचेच उमेदवार निवडून येणार आहेत.






विरोधकांकडून एकही अर्ज नाही


पाचही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदांसाठी सत्ताधारी गटातील उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले आहेत. विरोधकांनी एकाही पदासाठी अर्ज न केल्याने प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे संबंधित समित्यांच्या बैठकीत निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.



भाजपकडून मित्रपक्षांना प्रतिनिधित्व


महापालिकेतील संख्याबळाच्या जोरावर भाजपला पाचही समित्यांची सभापतीपदे मिळविणे शक्य असतानाही सत्तेतील मित्रपक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. सत्तावाटपानुसार महिला व बालकल्याण, विधी आणि शिक्षण समित्या भाजपकडे, तर शहर सुधारणा समिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आणि वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती शिवसेनेकडे देण्यात आली आहे. उपसभापतीपदांमध्ये मात्र भाजपला अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यामुळे विषय समित्यांच्या वाटपातून सत्ताधारी आघाडीतील समन्वयाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे.



८ आणि ९ ऑक्टोबरला निवडी


पाचही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदांची निवड प्रक्रिया ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ८ ऑक्टोबरला महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या निवडी, तर ९ ऑक्टोबरला शहर सुधारणा, विधी तसेच वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या निवडी होणार आहेत. विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने पाचही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदांच्या निवडी बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

Comments
Add Comment

BJP OBC MORCHA : भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; विविध पदांवर नव्या नियुक्त्या

भारतीय जनता पक्षाने शनिवारी आपल्या ओबीसी मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची यादी

JEE Main 2027 : Session 1 साठी नोंदणी उद्या संपणार; चुकवू नका ही शेवटची संधी

JEE Main 2027 Session 1 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची मुदत उद्या, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA)

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; सुरत-बिलीमोरा मार्गावर वीज यंत्रणा सुरू

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलं आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल

Apple Maps India update : Google Maps ला तगडी टक्कर! Apple Maps आता मराठीत बोलणार; पाहा नवीन ३डी आणि हायटेक फीचर्स!

वॉशिंग्टन : देशातील प्रवाशांसाठी रस्ते शोधणे आणि प्रवासाचे नियोजन अधिक सोपे व्हावे, यासाठी 'ॲपल' (Apple) कंपनीने

Pune Camp 8 hotels license suspended : पुणेकरांनो सावधान! बाहेर खाताय ? कॅम्पमधील ८ प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची मोठी कारवाई!

पुणे : पुणे शहरातील खवय्यांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महापालिकेने