
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली श्री विनायक मंदिरात पूजा अर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. 7 ऑक्टोबर 2026 रोजी त्यांच्या सरकारप्रमुख म्हणून सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळाने 6 ऑक्टोबर रोजी ठराव मंजूर करून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. ( Narendra Modi 25 Years)
मुंबई: मंत्रालयामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक ...
या विशेष प्रसंगी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या प्रवासावर आधारित एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, 'सेवा ज्योती' कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचे आभासी संबोधनही होणार आहे. हरियाणातील गुरुग्राम येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह भाजपचे अनेक नेते हे संबोधन ऐकणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील सरोजिनी नगरमधील श्री विनायक मंदिरात पूजा आणि अर्चा केली.માનનીય પ્રધાનમંત્રી શ્રી @narendramodi જીએ આજે નવી દિલ્હીના શ્રી વિનાયક મંદિરમાં પૂજા-અર્ચના કરી. https://t.co/XWN6X3F3E9
— BJP Gujarat (@BJP4Gujarat) October 7, 2026
पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सरकारप्रमुख म्हणून प्रवासानिमित्त विविध नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधानांच्या दीर्घ सार्वजनिक सेवेचा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या.
2001 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सलगपणे सरकारप्रमुख म्हणून काम केले आहे. गुजरातनंतर 2014 मध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्येही ते पंतप्रधान झाले. त्यामुळे 25 वर्षांचा हा टप्पा त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.Heartiest greetings and warm wishes to Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji on completing 25 years of service to the Nation as Head of Government.
Your journey as Pradhan Sevak has transformed the vision of inclusive development into a nationwide mission, guided by Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayaas. Across my visits to States and Union Territories, I have witnessed Bharat’s visible transformation through improved connectivity, digital advancement, expanding opportunities and inclusive development. The greatest achievement of your visionary leadership is liberating 25 crore people from extreme poverty. It is a landmark historical achievement that human history can never forget. May the Almighty bless you with good health, happiness and strength as you continue to serve Bharat on its journey towards an inclusive, prosperous and Viksit Bharat by 2047. @narendramodi — Vice-President of India (@VPIndia) October 7, 2026






