मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या आईचा म्हणजेच कल्याणी सदानंद ह्यांचा फोटो शेअर करून तिने आपल्या आईबद्दलची भावना व्यक्त केली आहे. तिने पोस्ट मध्ये असे लिहिले आहे कि, "आई मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे, तू मला स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करायचा आत्मविश्वास दिलास, संकटाला कसे सामोरे जायायचं ह्याच बळ तू मला दिलंस. तुझी आठवण कायम माझ्या मनात राहिली, तू अगदी प्रेमाने नाती जपलीस आणि सर्वांच्या मनात घर करून गेलीस". सोशल मिडियावर (SocialMedia) ही पोस्ट पडताच कलाकारांना व त्यांच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
prahaar.in/2026/10/07/kiara-advani-and-sidharth-malhotra-expect-second-child-post-shares-second-pregnancy-couple-announces-good-news/
मिळालेल्या माहितीनुसार कल्याणी सदानंद ह्यांचे निधन गोव्यात झाले आहे. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे अंत्यसंस्कार (Funerel) गोव्यातच केले जाणार आहे व इतर विधी मुंबई मध्ये केली जाणार आहे. तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिताना असंही लिहिलं की,आई तुला आता तुझ्या भावंडाना भेटून आनंद झाला असेल. तू एक पत्नी, आई, बहीण, आजी असे अनेक नाती अतिशय प्रेमाने जपली आहेस. तू जिथे कुठे असशील तिथे तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
कुनिका ह्यांच्या प्रोफेशनलबद्दल सांगायचं झालं तर कुनिका ह्या एक कलाकार असून त्यांनी टीव्ही, सिनेमाइंडस्ट्रीत तसेच बिगबॉस (Bigboss) सारख्या रिऍलिटी शो मध्ये देखील काम केलं आहे. कुनिका सदानंद पूर्णपणे खचली आहे, तिला दुःखातून बळ मिळावं म्हणून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.