Pune Crime: मालक समजून कर्मचाऱ्याचा खून! पुण्यातील रांजणगावात थरार

पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून दुसऱ्याच कामगाराची हत्या करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार आहेत. हमजा उस्मन शेख हे कारेगावच्या साईनगर प्लांटमध्ये काम करत असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली आणि त्यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी रांजणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने सार्थक कोहकडे ( वय २४), तुषार तोडकर (वय २६), संतोष मांजरे (वय ३७), विठ्ठल पिकले (वय २७) आणि योगेश इडोळे (वय २८) या पाच जणांना अटक केली आहे. तर पवन हुंदरे आणि पृथ्वी उर्फ भैय्या जाधव हे दोघे फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेचे आणि ‘समु इंटरप्रायजेस अ‍ॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्रकल्पाचे मालक विकास नवले यांना मारण्याचा डाव होता.



विकास नवले यांचा आरोपी सार्थकसोबत मालमत्तेचा वाद होता. या वादातून सार्थकने त्यांना संपवण्यासाठी तुषार तोडकरला कामाला लावले होते. त्यानंतर तोडकरने संतोष मांजरेशी संपर्क केला आणि त्याने नंतर हल्ला करण्यासाठी इतर साथीदारांना सोबत आणले. पोलिसांना असलेल्या संशयानुसार आरोपीने परिसराची पाहणी केली होती आणि नवले सकाळी तिथे येतील अशी अपेक्षा त्यांना होती. नवले साधारण त्याच वेळी प्लांटला भेट द्यायचे पण शेख हे पाण्याचा पंप चालू करण्यासाठी नेहमी लवकर यायचे. २९ सप्टेंबर रोजी हल्लेखोरांनी शेख यांना नवले समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यांचा मृत्यू झाला.


सुरुवातीला शेख यांचे कोणाशी भांडण नसल्याने तपस अधिकारी गोंधळात पडले होते. परंतु घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने आणि रांजणगाव पोलिसांनी CCTV फुटेज आणि तपासाच्या आधारे संतोष मांजरे हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशला पळून गेल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Comments
Add Comment

Nashik : 'विश्वगुरू’ भारतासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : “देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता मिळणे हे आपले भाग्य आहे. मोदी यांनी कधीही सुट्टी घेतली नाही.

Ashish Shelar : सावनेरमधील राम गणेश गडकरी स्मारकाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी!

आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिली स्मारकाची सविस्तर माहिती; संवर्धन व विकासकामांना चालना मिळण्याची

‘एमपीएससी’चे आंदोलन आता राजकीय झाले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या आधीच मान्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता

Mahila Shetkari Praman Patra : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र मुंबई : शेतीतील महिलांच्या योगदानाला ओळख

Nashik Crime : नाशिकमध्ये बसस्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई ! महिला चोरट्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा आणि अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या महिलेला स्थानिक

भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन, पण आरसीबीला बसणार फटका; लिलावाचं गणित असं बिघडणार!

भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 6