Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!

मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा २५ वर्षांचा सेवाप्रवास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपच्या वतीने बुधवारी ‘सेवा संकल्प अभियानां'तर्गत ‘विकसित भारत @२०४७’ संकल्प सभा आणि ‘सेवा ज्योती यात्रा’चा प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवापर्वाचे कौतुक करत २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

मोदींच्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनिमित्ताने विशेष कार्यक्रम


मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून २००१ मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या राजकीय सेवेला बुधवारी २५ वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदींचा २५ वर्षांचा सेवाप्रवास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजपच्या वतीने बुधवारी ‘सेवा संकल्प अभियानां'तर्गत ‘विकसित भारत @२०४७’ संकल्प सभा आणि ‘सेवा ज्योती यात्रा’चा प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवापर्वाचे कौतुक करत २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.


गिरगाव चौपाटीजवळील भारतीय विद्या भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, (Ravindra Chavan) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोदी यांच्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा गौरव केला.


२००१ मध्ये याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी २५ वर्षे काम केले. हा कालखंड समर्पण, विकास आणि मानवकल्याणाचा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या १२ वर्षांत भारताला ‘फ्रॅजाइल फाइव्ह’मधून ‘टॉप फाइव्ह’ अर्थव्यवस्थांमध्ये आणण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचा दावा त्यांनी केला. देशातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम झाल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. आता २०४७ मध्ये विकसित भारत साकारण्याचा संकल्प करण्यात आला असून, तो पूर्ण करण्यासाठी ‘वी विल डू इट’ असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या वतीने फडणवीस यांनी मोदी यांना २५ वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.

Comments
Add Comment

MLC Election: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी बहुरंगी लढती; पुणे, नागपूर, अमरावतीत बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची

Pune MPSC Protest : ‘रोहित पवारांनी आधी संविधानाचा अभ्यास करावा’; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावर नवनाथ बन यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन

Navnath Ban On Rohit Pawar: रोहित पवारांच्या आंदोलनात विद्यार्थीच नाहीत; नवनाथ बन यांनी व्हिडीओ दाखवत केली पोलखोल

पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे आंदोलन हे एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय

मुंबई : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण

Nitesh Rane: "MPSC विद्यार्थ्यांनो निश्चिंत राहा, सरकार तुमच्या पाठीशी", मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या

आपण कॉकरोच नाही पँथर आहोत, कॉकरोचवाल्यांची मगरुरी चांगली नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा पक्ष आहे. आपण सत्तेत जरुर आहोत, पण अन्याय