सध्या सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे Amazon आणि Flipkart या दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या फेस्टिव्ह सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेल दरम्यान विविध बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर इन्स्टंट डिस्काउंट आणि कॅशबॅकच्या आकर्षक ऑफर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तथापि, केवळ मोठ्या सवलतींची जाहिरात पाहून खरेदी करण्याऐवजी आपल्याकडे असणाऱ्या कार्डवर नेमका काय फायदा मिळतोय, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आणि फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल लवकरच सुरू होत असून फ्लिपकार्टच्या प्लस व प्रीमियम सदस्यांना तसेच त्यांच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डधारकांना एक दिवस आधीपासूनच या सेलचा लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्टवर Axis Bank आणि ICICI Bank च्या कार्ड्सवर १०% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंटचा पर्याय आहे, तर super.money सेवेद्वारे पहिल्या व्यवहारावर विशिष्ट अटींनुसार कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो. दुसरीकडे, अॅमेझॉनवर SBI च्या डेबिट व क्रेडिट कार्ड्सवर १०% इन्स्टंट सवलत आणि EMI पर्यायांवरही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. याशिवाय Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर अनलिमिटेड कॅशबॅक आणि Amazon Pay Later द्वारेही काही अतिरिक्त फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत.
भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचा कार्यकाळ अखेर संपुष्टात आला आहे. अजित आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये निवड समिती अध्यक्षपद ...
मात्र, '१०% पर्यंत सूट' या सूचनेचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक खरेदीवर संपूर्ण १०% रक्कम वाचेल. प्रत्यक्षात मिळणारी सवलत ही तुम्ही केलेल्या एकूण खरेदीची रक्कम, कार्डचा प्रकार आणि बँकेने ठरवून दिलेली कमाल मर्यादा (Maximum Discount Limit) यावर अवलंबून असते. अनेकदा काही कॉर्पोरेट कार्ड्स या ऑफर्समधून वगळले जातात, तसेच सामान्य व्यवहार आणि EMI व्यवहारांचे नियमही भिन्न असतात. त्यामुळे कोणताही व्यवहार अंतिम करण्यापूर्वी चेकआउट पेजवर मिळणारी प्रत्यक्ष सवलत, किमान खरेदीची अट आणि इतर नियम नीट तपासून पाहणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.