
नाशिक : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्डातील ‘अप’ यार्ड लाइन विस्तारीकरणाच्या कामासाठी १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईहून उत्तर महाराष्ट्र तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम नाशिक, जळगाव आणि भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे.
१४ आणि १५ ऑक्टोबरला या गाड्यांचे मार्ग बदलणार
१४ ऑक्टोबरला १२५९८ मुंबई-गोरखपूर, ११०४३ दादर-बलिया आणि १२१३९ मुंबई-नागपूर एक्सप्रेस या गाड्या कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड मार्गे वळवण्यात येणार आहेत. १५ ऑक्टोबरला १२१८८ मुंबई-जबलपूर गरीब रथ, ११०४७ दादर-गोरखपूर आणि १२१३९ मुंबई-नागपूर एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान अनेक गाड्या पर्यायी मार्गाने
१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या त्यांच्या नियमित मार्गाऐवजी जळगाव-नंदुरबार-वसई रोड-ठाणे किंवा मनमाड-पुणे-लोणावळा-कल्याण या पर्यायी मार्गाने धावणार आहेत. यामध्ये १२८६० हावडा-मुंबई, १२५३३ गोमती नगर-मुंबई, १५०६६ पनवेल-गोरखपूर, १७०५७ मुंबई-लिंगमपल्ली, १७६१२ मुंबई-हजूर साहिब नांदेड, १२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन, १३२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर, २२२२१ मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी आणि १२१३७ मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल या गाड्यांचा समावेश आहे.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर RBI ने रेपो ...
उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाचे
हावडा-मुंबई, गोमती नगर-मुंबई, गोरखपूर-मुंबई आणि प्रयागराज-मुंबईसह काही गाड्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड आणि ठाणे या मार्गाने मुंबईला पोहोचणार आहेत. १६ ऑक्टोबरला १२८६० हावडा-मुंबई, १२५३३ गोमती नगर-मुंबई, १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि २०४३६ प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबरला २०४३५ लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज, १३२०२ राजगीर एक्सप्रेस, २२२२१ राजधानी आणि १२१३७ पंजाब मेलसह अन्य गाड्या बदललेल्या मार्गाने धावणार आहेत.
१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान अनेक गाड्या रद्द
१६ ऑक्टोबरला १२११२ अमरावती-मुंबई आणि १२१४० नागपूर-मुंबई एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. १७ ऑक्टोबरला मुंबई-अमरावती, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत, साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत, मुंबई-नागपूर, मुंबई-धुळे, धुळे-मुंबई, मुंबई-बल्लारशाह, मुंबई-मनमाड आणि मनमाड-मुंबई या गाड्या रद्द राहणार आहेत. १८ ऑक्टोबरला ११००२ बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
नांदेड-मुंबईच्या काही गाड्या मनमाड, नाशिक रोडपर्यंतच
१७ ऑक्टोबरला १२०७२ हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी आणि १७६१८ हजूर साहिब नांदेड-मुंबई एक्सप्रेस मनमाडपर्यंतच धावणार आहेत. मनमाड ते मुंबईदरम्यानचा प्रवास रद्द राहील. तसेच २०७०५ हजूर साहिब नांदेड-मुंबई वंदे भारत नाशिक रोडपर्यंतच धावणार असून, नाशिक रोड ते मुंबईदरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. याच दिवशी मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी मुंबईऐवजी मनमाडहून सुटेल, तर मुंबई-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस नाशिक रोडहून सुटणार आहे. त्यामुळे मुंबई ते मनमाड आणि मुंबई ते नाशिक रोडदरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे.
मुंबई : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. एप्रिल ते जून २०२६ या ...
या गाड्यांना मोठा विलंब
१६ ऑक्टोबरला काही गाड्या मोठ्या विलंबाने धावणार आहेत.
- ११०६२ जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस – ४ तास विलंब - ११०८२ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस – ५ तास विलंब - १२८७० हावडा-मुंबई – ७ तास विलंब - ११०७२ बलिया-लोकमान्य टिळक टर्मिनस – साडेचार तास विलंब
१७ ऑक्टोबरला देखील अनेक गाड्यांच्या वेळेत मोठा बदल होणार आहे.
- मुंबई-नागपूर दुरांतो – ५ तास २५ मिनिटे विलंब - मुंबई-हावडा मेल – ४ तास २० मिनिटे विलंब - मुंबई-हावडा एक्सप्रेस – ३ तास ४५ मिनिटे विलंब - मुंबई-अमृतसर एक्सप्रेस – ३ तास विलंब - दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस – ४ तास विलंब
प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासावे
विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या गाडीचा अद्ययावत मार्ग, वेळ आणि धावण्याची स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




