Sunday, November 22, 2026

Shafqat Amanat Ali: 'मितवा' फेम गायक शफकत अमानत अली कॅन्सरशी झुंज देत होते; आता पुन्हा संगीतविश्वात परतणार

एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याला ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. ज्यामुळे त्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

Mitwa Singer: 'मितवा' फेम सुप्रसिद्ध गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच गाण्यांना आवाज दिला आहे. 'कभी अलविदा ना कहना' (kabhi alvida na kehna) या सिनेमातील 'मितवा' (Mitwa) हे गाणं आपल्या आवाजाने शफकत अली यांनी अजरामर केले. या गाण्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी होते. या गाण्यामुळे शफकत अमानत अलीला जगभरात ओळख मिळाली. सध्या हा गायक बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. भारतातही दिसला नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याला ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. ज्यामुळे त्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

शफकत अमानत अली काय म्हणाला?

मल्टिपल मायलोमा नावाचा रक्ताचा कर्करोग शफकत अमानत अली यांना झाला आहे. पण आता प्रकृती खूप सुधारली आहे. या आजारामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. वर्षभर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे विश्रांतीची गरज होती. तसेच बोन मॅरो बायोप्सीचे रिपोर्ट क्लिअर आले आहे, हे एक चांगले लक्षण आहे. मी आता धोक्याबाहेर आहे', असं गायकाने सांगितले आहे. सध्या आठवड्यातून एकदा त्यांची सौम्य किमोथेरपी सुरू असून, लवकरच ऑटो ट्रान्सप्लान्ट केल्यानंतर ते पूर्णपणे बरे होतील. तसेच आजारपणामुळे म्युझिक इंडस्ट्रीपासून दूर राहिलेले शफकत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

तर काही गायकांच्या म्हणण्यानुसार, 'या आजारापणामुळे मी संगीत जगतापासून दूर होतो. पण आता परत येण्यास तयार आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, गायकाचा कॉन्सर्ट 28 नोव्हेंबर 2026 रोजी कराचीमध्ये होणार आहे. त्यानंतर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्याने यावेळेस कॅन्सरसारख्या आजारांबद्दल जागरुक राहण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. जर शरीरात कुठेही वेदना होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे गायकाने यावेळी आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >