Mumbai Crime : गुप्तरोगाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; मुंबई पोलिसांनी एका झटक्यात आवळल्या 10 जणांच्या मुसक्या

गुप्तरोगांसह विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा करत हे जण मुंबईतील वेगवेगळ्या भागांत क्लिनिक चालवत होते. क्राईम ब्रँच युनिट 7 आणि मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

मुंबई : कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या 10 जणांवर मुंबई क्राईम ब्रँचने कारवाई केली आहे. गुप्तरोगांसह विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा करत हे जण मुंबईतील वेगवेगळ्या भागांत क्लिनिक चालवत होते. क्राईम ब्रँच युनिट 7 आणि मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.


भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरातील काही क्लिनिकवर छापे टाकण्यात आले. या ठिकाणी रुग्णांवर विविध पद्धतींनी उपचार केले जात असल्याचे तपासात समोर आले. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीची औषधे वापरली जात होती. उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


कारवाईदरम्यान काही क्लिनिकमध्ये मुदत संपलेली आयुर्वेदिक आणि युनानी औषधे आढळून आली. तसेच औषधांची विक्री केली जात असल्याचेही समोर आले. छापेमारीत औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून त्यांनी आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केले आणि आणखी कुठे अशा प्रकारची क्लिनिक सुरू आहेत का, याचा तपास केला जात आहे.





पोलिसांच्या कारवाईत भांडूपमधील संतोष हेल्थ क्लिनिक, विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना, बोरीवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरमधील दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक आणि मानखुर्दमधील समर आयुर्वेदिक दवाखान्यावर कारवाई करण्यात आली.


या कारवाईमुळे वैद्यकीय पदवी आणि अधिकृत नोंदणी नसताना उपचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची वैद्यकीय पदवी आणि नोंदणी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

















Comments
Add Comment

PM Narendra Modi : "दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारलं!"; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तराची आठवण

सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या प्रवासावर भाष्य नवी दिल्ली : सरकारप्रमुख म्हणून सेवेची २५ वर्षे पूर्ण

मुंबईत लांब पल्ल्याच्या गाड्या वाढणार; ग्रँट रोड अन् लोअर परेल येथील जुन्या भूखंडांचा पश्चिम रेल्वेकडून होणार कायापालट

ग्रँट रोडवरील ब्रिटिशकालीन जुना पार्सल डेपो आणि करी रोड व लोअर परेल स्थानकांदरम्यानचा एक विस्मृतीला गेलेला

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकची बँकिंग यंत्रणा सज्ज ! रोख पुरवठ्यापासून डिजिटल व्यवहारांपर्यंत विशेष नियोजन

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक,

Premanand Maharaj And Virat Kohli : "विराटला ५ कोटी देऊन आश्रमात आणलं ?" फलाहारी महाराजांच्या खळबळजनक दाव्यावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया!

वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांच्या केलिकुंज आश्रमावरून सध्या एक नवा वाद उफाळून आला

Kalyani Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी

PM Narendra Modi : "मी कोणत्याही महत्त्वाकांक्षेसाठी नाही, तर ध्येयासाठी जगतो"; सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक!

नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता, कारण लहानपणापासून मिळालेले संस्कार आणि