Wednesday, October 7, 2026

Nitesh Rane : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या सेवाकार्याला मंत्री नितेश राणेंनी दिल्या शुभेच्छा!

२००१ पासून सुरू झालेल्या मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाने २५ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून, या काळात राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाकार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. २००१ पासून सुरू झालेल्या मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाने २५ वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून, या काळात राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

गरीब, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अनेक परिवर्तनकारी उपक्रमांना या काळात दिशा मिळाली. आधुनिक रस्ते, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे तसेच डिजिटल पायाभूत सुविधांचे जाळे देशभर विस्तारले. त्याचबरोबर अर्थव्यवस्था, संरक्षण क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताने प्रगती केल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक पातळीवर भारताचा आत्मविश्वास, प्रभाव आणि नेतृत्व अधिक भक्कम करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या विकासालाही या काळातील परिवर्तनाची साथ मिळाली. महाराष्ट्रात नवीन प्रकल्पांची उभारणी, रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांना चालना देण्याचे काम सुरू असून, त्यामुळे राज्याच्या विकासाचा वेग वाढत असल्याचे राणे यांनी म्हटले. २५ वर्षांची राष्ट्रनिर्माणाची ही वाटचाल अशीच वेगाने पुढे जावो, अशी सदिच्छाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >