Premanand Maharaj And Virat Kohli : "विराटला ५ कोटी देऊन आश्रमात आणलं ?" फलाहारी महाराजांच्या खळबळजनक दाव्यावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया!

प्रेमानंद महाराजांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohali) तब्बल ५ कोटी रुपये देऊन आश्रमात आणण्यात आले होते. राजस्थानमधील एका कंपनीने अथवा बिल्डर लॉबीने हा सर्व खर्च केला होता, असा दावा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांना लिहिलेल्या पत्रात केला.

वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांच्या केलिकुंज आश्रमावरून सध्या एक नवा वाद उफाळून आला आहे. श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे अध्यक्ष फलाहारी महाराज (दिनेश शर्मा) यांनी एक खळबळजनक दावा करत आरोप केला होता की, प्रेमानंद महाराजांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohali) तब्बल ५ कोटी रुपये देऊन आश्रमात आणण्यात आले होते. राजस्थानमधील एका कंपनीने अथवा बिल्डर लॉबीने हा सर्व खर्च केला होता, असा दावा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांना लिहिलेल्या पत्रात केला.



विराट कोहलीच्या टीमकडून आरोपांचे खंडन



फलाहारी महाराजांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता विराट कोहलीच्या बाजूने अधिकृत स्पष्टीकरण समोर आले आहे. विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी एक विशेष निवेदन जारी करत हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. "फलाहारी महाराज यांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे असत्य, निराधार आणि काल्पनिक आहेत. विराट कोहली हे केवळ आणि केवळ प्रेमानंद महाराजांबद्दल असलेल्या अथांग श्रद्धेपोटी व आदरापोटी त्यांची भेट घेण्यासाठी आश्रमात जातात," असे स्पष्टीकरण निवेदनात देण्यात आले आहे. तसेच प्रसारमाध्यमांनी अशा कोणत्याही अफवांची किंवा दाव्यांची शहानिशा केल्याशिवाय बातम्या प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहनही विराटच्या टीमने केले आहे.



पत्रात झेड प्लस सुरक्षेची मागणी






फलाहारी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असाही आरोप केला आहे की, ज्या गटाने किंवा बिल्डर लॉबीने ५ कोटी रुपये खर्च केले होते, तेच लोक आता प्रेमानंद महाराजांच्या नावाचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार करत आहेत. या सर्व बाबींमुळे आश्रमात तणावाचे वातावरण असून प्रेमानंद महाराजांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने 'झेड प्लस' (Z+) सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी फलाहारी महाराजांनी केली आहे.



शिष्याच्या आत्महत्येनंतर संशयाचे जाळे अधिक गढूळ


दुसरीकडे, केलिकुंज आश्रमातील हे वादळ शमण्याचे नाव घेत नसून, २५ सप्टेंबर रोजी प्रेमानंद महाराजांचे शिष्य दीपक कुमार उर्फ रसिक दुलारी शरण यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्येनंतर हे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. रसिक दुलारी यांच्या शरीरावर आढळलेल्या जखमांच्या खुणा आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आश्रमात सध्या मोठा गोंधळ आणि खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Hyderabad News : हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोटांची धमकी; 300 जणांना ठार मारण्याचा इशारा, पोलीस सतर्क

Hyderabad News: लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या नावाने कथितरित्या देण्यात आलेल्या धमकीनंतर हैदराबाद पोलिसांना

Delhi News : 55 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हरवली; दिल्ली पोलिसांनी सहा दिवसांत शोधून मालकाला केली परत

दिल्ली : दिल्लीतील काश्मिरी गेट आंतरराज्य बस स्थानकावर (ISBT) हरवलेली सुमारे 55 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या

Cousin Marriage: मामाच्या मुलीशी विवाह करण्याची प्रथा बंद होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेमुळे चर्चा सुरू

Cousin Marriage: रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे जन्माला येणारी नवी पिढी यांबाबत आरोग्यविषयक

Rajasthan Viral News : 'बडा अजब आदमी है!' बायकोशी भांडण झालं अन् 500 रुपयांच्या नोटांचा ढीग पेटवला; व्हिडिओ व्हायरल

Viral News: राजस्थानमधील एका कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Viral News: बापरे! मेहुण्याकडून दोन नवरदेवांना घातला दोन कोटी रुपयांचा हार, व्हिडिओ व्हायरल

Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर

Agniveer : अग्निवीरांसाठी दिलासादायक निर्णय; दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाहाला परवानगी

Defence News: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांना दोन वर्षांच्या सेवा मुदतवाढीदरम्यान विवाह