Women Running Viral Video: होम गार्ड बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साडी नेसून अनवाणी धावली झारखंडमधील महिला

सध्या सोशल मीडियावर अनवाणी पायाने साडी नेसून धावत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच वायरल होतोय. ही व्हिडिओ आहे झारखंड येथील. झारखंड येथील रामगढ जिल्ह्यातील दुल्मी ब्लॉकमधील सोसो गावात राहणाऱ्या कविता कुमारी नावाच्या महिलेने अनवाणी पायांनी १६०० मीटरची शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण करून अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. होमगार्ड भरतीसाठी झालेल्या या चाचणीतील हा व्हिडिओ एका प्रेक्षकाने चित्रित करून सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडियावरील इतर पोस्टनुसार, प्रचंड उष्णता आणि मर्यादित संसाधने असूनही, कविताने ही शर्यत निर्धारित १० मिनिटांच्या मर्यादेच्या आत, केवळ सहा मिनिटांत पूर्ण केली.


कविता कुमारी यांच्या कुटुंबात दोन लहान मुलं आणि वृद्ध सासू सासरे आहेत. घरखर्च भागवण्यासाठी विटभट्टीमध्ये त्या काम करतात. शर्यतीसाठी लागणारे रनिंग शूज, ट्रॅकसूट किंवा इतर साहित्य विकत घेणे त्यांना परवडणारे नव्हते. उओलब्ध असलेल्या तुटपुंज्या साधनांच्या जोरावर त्या भरतीची तयारी करत होत्या. रोज पहाटे ४ वाजता उठून अनेकदा साडी नेसून त्या धावण्याचा सराव करायच्या. होमगार्डमध्ये नोकरी मिळवून आपल्या मुलांना अधिक स्थिर भविष्य देणे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.





रामगढमध्ये २८४ पदांसाठी होमगार्ड भरती मोहीम राबवली जाणार आहे. शारीरिक क्षमता आणि लेखी परीक्षा २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. निम्मी पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, तर विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी अतिरिक्त ५% आरक्षण देण्यात आले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर लक्ष वेधले असून कविताचे कौतुक होत आहे. आपल्या मुलांसाठी आणि सासरच्या लोकांसाठी स्थिर उदरनिर्वाह मिळवण्यासाठी कविताने दाखवलेल्या जिद्दीचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime: मालक समजून कर्मचाऱ्याचा खून! पुण्यातील रांजणगावात थरार

पुण्यातील रांजणगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून दुसऱ्याच

Nashik Crime : नाशिकमध्ये बसस्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई ! महिला चोरट्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा आणि अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या महिलेला स्थानिक

भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन, पण आरसीबीला बसणार फटका; लिलावाचं गणित असं बिघडणार!

भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 6

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced : प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, १४ वर्षाच्या सुखी संसारानंतर जोडप्याने घेतला काडीमोड

मुंबई : अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Vijayendra Kumaria) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी समोर आली. "नागिन" फेम

Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे अधिक मदतीची मागणी

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथक राज्यात पाहणी करणार मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर

Airtel च्या ग्राहकांना मोठा दणका : पोस्टपेड प्लॅन ५० रुपयांनी महाग; पण फ्री मिळणार आंतरराष्ट्रीय रोमिंगचा फायदा

टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी Airtel ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने