आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघात गळती! दोन दिग्गजांनी सोडली साथ

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. असं असताना पंजाब किंग्सच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोचिंग स्टाफमधून दोन जणांना फ्रेंचायझीची साथ सोडली आहे. मिनी लिलाव जवळ असताना पंजाब किंग्ससाठी हा धक्का आहे.

1/5 आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमधून दोन जणांनी फ्रेंचायझीला सोडचिठ्ठी दिली. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी साथ सोडली आहे. होप्स आणि हॅडिन या दोघांवरही पाँटिंगचा विश्वास होता.पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणि नंतर दोन वर्षे पंजाब किंग्समध्ये संघसहकारी होते. (Photo: ANI)

2/5 ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. हॅडिन पंजाब किंग्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, तर होप्स वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक होते. मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांनी अलीकडेच पंजाब किंग्स व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाबद्दल कळवले आहे. (Photo: ANI)

3/5 होप्स आणि हॅडिन यांच्या राजीनाम्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी नवीन भूमिका स्वीकारली आहे. होप्स यांची क्वीन्सलँड अँड ब्रिस्बेन हीट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे, तर हॅडिन यांनी न्यू साउथ वेल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo: ANI)

4/5 पंजाब किंग्समध्ये रिकी पाँटिंग हे एकमेव मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या साथीला नवीन सहाय्यक कर्मचारी शोधावे लागतील. भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असलेले साईराज बहुतुले यांनीही यावर्षी आयपीएलनंतर संघ सोडला. तसेच टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये रूजू झाले. बहुतुले यांनी पंजाब संघात सुनील जोशी यांची जागा घेतली होती. (Photo: ANI)

5/5 रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली पंजाब किंग्स संघात कमालीची सुधारणा झाली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ 2025 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. आयपीएल 2026 मध्ये पंजाबने सलग सहा सामने जिंकून दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर सात पैकी सहा सामने गमावले आणि प्लेऑफची संधी हुकली. आता आयपीएल 2027 पूर्वी पाँटिंगला नवा सघा बांधावा लागणार आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला