Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. नाना पाटेकरांच्या निधनानंतर चाहतावर्ग, नेते मंडळी तसेच सिने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सिनेकलाकारांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर ट्विट आणि पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Nana Patekar passes away :  हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. पाटेकरांनी पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. नाना पाटेकरांच्या निधनानंतर चाहतावर्ग, नेते मंडळी तसेच सिने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सिनेकलाकारांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर ट्विट आणि पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



सिनेकलाकारांच्या नाना पाटेकरांसाठी डोळे पाणावणाऱ्या पोस्ट


...खरच आज एका युगाचा अस्त झाला आहे, असे म्हणत अभिनेता रितेश देशमुखने भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. 'ब्लफमास्टर' आणि 'हाउसफुल ५' मध्ये नाना पाटेकर आणि रितेश देशमुख यांनी सोबत काम केले होते.





नानाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले आहे.ते अशा काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करण्याची गरज भासत नसे. तुम्ही आता आमच्यात नाही आहात, यावर विश्वासच बसत नाहीये. असं म्हणत अक्षय कुमारही भावुक झाला.





तुमची खूप आठवण येतेय, नानाजी... आपण एकत्र घालवलेले क्षण, त्या गप्पा-गोष्टी, ती खडाजंगी, तुम्ही स्वतः बनवलेले जेवण आणि तुम्ही दिलेले ज्ञान - या सर्व गोष्टी मी नेहमीच जपून ठेवेन. माझ्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशा भावना अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केल्या आहेत.





एक मच्छर आदमीको…! नाना पाटेकर यांच्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करून देत परेश रावल यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.





भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेते, नाना पाटेकर सर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक विलक्षण प्रामाणिकपणा आणि तीव्रता दिसून येत असे. त्यांच्या अभिनयात कधीही केवळ 'अभिनय' केल्याचा भास झाला नाही, तर पडद्यावर प्रत्यक्ष जीवनच उलगडत असल्याचा अनुभव आला. असे हे एक अद्वितीय कलाकार, ज्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील.त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे असे म्हणतअभिनेता Jr NTR यांनीही नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.






;

अलविदा मेरे दोस्त, नाना पाटेकर। बहुत सारा प्यार। असे म्हणत अनुपम खेर यांनीही नाना पाटेकर यांच्या जुन्या आठवनींना उजाळा दिला.






हो, कोणालाच अमरत्व नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे... पण तरीही, इतक्या कणखर माणसाच्या बाबतीत असे अचानक काहीतरी घडू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. असे म्हणत राम गोपाळ वर्मा हे देखील भावुक झाले.

Comments
Add Comment

Nana Patekar : 'आपला माणूस' हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced : प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, १४ वर्षाच्या सुखी संसारानंतर जोडप्याने घेतला काडीमोड

मुंबई : अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Vijayendra Kumaria) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी समोर आली. "नागिन" फेम

एक स्त्री, एक सत्य आणि एक लढा! अभिषेक कंवर दिग्दर्शित ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित !

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आणि उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी

Kalyani Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी

Kiara And Siddharth Second Child : 'कुणीतरी येणार येणार गं...' कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

मुंबई : बॉलिवूडचे लाडके जोडपे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth Malhotra) यांच्या घरी