Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!

ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन भारतात कधीही केलेलं नाही. त्यामुळे भारतात या स्पर्धेचं आयोजन व्हावं अशी इच्छा क्रीडाप्रेमींची आहे. 2036 भारताला यजमानपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण यातही सहा देश भारताच्या शर्यतीत आहेत.

1/5 ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण गेल्या काही वर्षात पदकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असं असताना भारत या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे. पण भारतापुढे आव्हान असणार आहे. (Photo: ANI)

2/5 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक 2036 स्पर्धेचं आयोजन भारतात व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघ पूर्ण जोर लावत आहे. (Photo: ANI)

3/5 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने ऑलिम्पिक 2036 साठी भारताचा दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण यजमानपदाच्या शर्यतीत इतर देशही आहेत. त्यामुळे हे आव्हान मोठं असणार आहे. (Photo: ANI)

4/5 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने स्पष्ट केलं की, 2036 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतासह जर्मनी, दक्षिण कोरिया, दक्षिण अफ्रिका, हंगेरी, तुर्की आणि कतर हे देश शर्यतीत आहेत. यात जर्मनी आणि दक्षिण अफ्रिकेने स्पर्धेचं यजमानपद भूषवलं आहे. (Photo: ANI)

5/5 भारताकडून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अहमदाबाद शहराचा दावा सादर केला आहे. हा दावा मजबूत करण्यासाठी भारताने 2030 चे कॉमनवेल्थ गेम्स अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार : मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र

Nashik : अंबडमधील पिवळ्या रसायनमिश्रित पाण्याने खळबळ ! गरज भासल्यास संबंधित कंपन्या बंद करण्याची कारवाई करावी, मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची केंद्रीय पथकांकडून पाहणी सुरू; ११ सदस्यांचे पथक राज्यात दाखल

मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याची

MLC Election: विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट, परस्परांविरोधात अर्ज दाखल

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीतील

मंत्री नितेश राणे यांची आंध्रचे बंदरे मंत्री जनार्दन रेड्डी यांच्यासोबत बैठक; बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्याच्या उपक्रमांबाबत चर्चा

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या सागरी आणि बंदरकेंद्रित