आधुनिक फीड तंत्रज्ञानाचा अभ्यास; महाराष्ट्रातील मत्स्यपालनाला मिळणार नवी दिशा : मंत्री नितेश राणे

भारतामधील प्रमुख ॲक्वाकल्चर फीड उत्पादक कंपनी Deepak Nexgenच्या या केंद्राला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. मत्स्य व कोळंबी पालनातील आधुनिक पोषण तंत्रज्ञानाचा अभ्यास केला गेला. महाराष्ट्रातील ॲक्वाकल्चर क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त बाबींचा वापर करणार, असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं.

1/5 आंध्र प्रदेशच्या सागरी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बोम्मुलुरू, एलुरू जिल्हा येथील Nexgen Feeds या अत्याधुनिक उत्पादन व ॲक्वाकल्चर सोल्युशन्स केंद्राला भेट देऊन आधुनिक मत्स्य व कोळंबी पोषणामागील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली.

2/5 भारतामधील प्रमुख ॲक्वाकल्चर फीड उत्पादक कंपनी असलेल्या Deepak Nexgenच्या या केंद्रात कच्च्या मालाच्या प्रक्रियेपासून फीड निर्मिती व फॉर्म्युलेशन, गुणवत्ता तपासणी तसेच मत्स्यपालनासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध विशेष उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी यावेळी करण्यात आली.

3/5 Nexgenच्या Kingfish आणि ifeed या ब्रँड्सअंतर्गत उपलब्ध उत्पादनांसोबतच Vannamei कोळंबीसाठी विशेष फीड, Functional Nutrition, Probiotics, Minerals, Feed Additives तसेच मत्स्यपालनातील आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी घेतली.

4/5 मत्स्य व कोळंबीची निरोगी वाढ, फीडचा कार्यक्षम वापर, सातत्यपूर्ण पोषण तसेच जलगुणवत्ता सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही यावेळी अभ्यास करण्यात आला. फीड उत्पादनापासून थेट मत्स्यपालनाच्या शेतापर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी समजून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

5/5 वैज्ञानिक पोषण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मत्स्य शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी या अभ्यास दौऱ्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्रात प्रभावीपणे उपयोग करण्याचा प्रयत्न राहील, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Central Railway: मध्य रेल्वेने लाखो विना तिकीट प्रवाशांकडून करोडो रूपयांचा दंड वसूल

मुंबई: मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स संघात गळती! दोन दिग्गजांनी सोडली साथ

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे. असं असताना पंजाब किंग्सच्या गोटातून चिंता वाढवणारी

Mumbai Metro 3 Aqua Line ची वर्षपुर्ती, MMRC कडून प्रवाशांसाठी खास उपक्रम

मुंबई: कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मार्गावरील ॲक्वा लाईन मेट्रोला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरामध्ये

महाराष्ट्राच्या पाणी चळवळीचा आधार हरपला : पद्मश्री डॉ. पोपटराव पवार

हिवरेबाजारच्या पाणी नियोजनाबाबत अतिशय आत्मीयतेने बोलणारे आणि महाराष्ट्रातील दुष्काळ व आत्महत्यांच्या

आता स्मार्ट तंत्रज्ञानातून होणार मत्स्यपालन; मंत्री नितेश राणेंचा अभ्यास दौरा

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान भीमावरम येथील AquaExchangeच्या IoT-सक्षम मत्स्यपालन केंद्राला भेट

फिट असूनही जसप्रीत बुमराह टी20 संघातून बाहेर का? टीम इंडियाच्या गोटात नक्की काय शिजतंय?

[caption id="attachment_1065115" align="aligncenter" width="800"] भारताने एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.आत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील