मुंबई: बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनामुळे अख्ख्या भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोव्यातील डोना पाऊला येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे नाना पाटेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणारे नाना पाटेकर अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहेत. नानांच्या निधनानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. त्यांची पत्नी कोण? नेमक्या त्या काय करतात? याबद्दल अनेकांना आजही प्रश्न पडला आहे.
1978 साली 'गमन' चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये नानांनी पदार्पण केले. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नानांनी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत आणि मराठी सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या नानांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फारसं अनेकांना ठाऊक नाहीये. फार कमी लोकांना माहितीये, नानांच्या पत्नीचं नाव निलकांती पाटेकर आहे. निलकांती पाटेकर ह्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या निलकांती पाटेकर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. निलकांती आणि नाना यांची लव्हस्टोरी एका नाटकाच्या रिहर्सल पासून सुरू झाली आहे. पण जरीही त्यांचा प्रेमविवाह असला तरीही ते गेल्या 35 वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहतात.
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण ...
नीलकांती आणि नाना यांची ओळख 'जात न पूछो साधु की' या नाटकाच्या रिहर्सलपासून झाली. त्या दोघांनीही पहिल्यांदाच या नाटकामध्ये एकत्र काम केले होते. लल्लनटॉपसोबत बोलताना नानांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. जेव्हा ते आणि नीलाकांती भेटले तेव्हा निलकांती बँकेमध्ये नोकरीला होत्या. नानांपेक्षा कित्येक पटीने चांगला पगार निलकांती ह्यांना होता. नानांना एका नाटकासाठी 50 रूपये मानधन होतं. निलकांती ह्यांना 2500 इतकी सॅलरी होती. 15 ते 20 नाटकांतून नाना महिन्याकाठी 750 रूपये कमवायचे. निलकांती यांनी नानांच्या करियरसाठी पुढे जाण्यासाठी फार पाठिंबा दिला. त्यांनी नानांना फायनान्शियली खूप सपोर्ट केलं होतं. नाटकातून ओळख झाल्यानंतर दोघांचीही मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं.
मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाल्यानंतर नाना आणि निलकांती यांनी 1978 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा नाना 27 वर्षांचे होते. लग्नाच्या काही वर्षानंतर नाना आणि निलकांती ह्यांनी मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव दुर्वासा असं होतं. पण त्याचं वयाच्या अडीचाव्या वर्षी निधन झालं. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांना आणखी एक मुलगा झाला, ज्याचं नाव त्यांनी मल्हार असं ठेवलं. स्टारडम आणि अभिनय कौशल्य असतानाही निलकांती यांनी आपल्या वैवाहिक जीवानाला महत्त्व देत, त्यांनी इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कालांतराने नाना आणि निलकांती यांच्यातील मतभेदामुळे त्यांनी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. वेगळे राहत असतानाही त्यांनी कायदेशीर रित्या एकमेकांपासून घटस्फोट घेतला नाही. अनेक मुलाखतींमध्ये नानांनी निलकांती यांच्यासोबत त्यांचं भावनिक संबंधांपेक्षा परस्पर आदराचे नाते होते.
नाना पाटेकर आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार... डॉन ते संशयी पती! 'त्या' 3 भूमिकांचा थरार तुम्हाला माहितीये का? मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ...
अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर निलकांती यांनी 2025 साली रिलीज झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, 'छावा' चित्रपटातून पुन्हा अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यांनी चित्रपटामध्ये धाराऊची भूमिका साकारली होती. निलकांती यांचे वडील सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना कायम वेगवेगळ्या शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागत होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी IIT चे शिक्षण घेतले. निलकांती यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी फिजिक्स विषयामध्ये करियर करावं, पण त्यांनी तिथे करियर न करता अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावलं.
निलकांती यांनी 1966 मध्ये बालकलाकार म्हणून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी मराठी रंगभूमीवर एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आणि असंख्य पुरस्कार जिंकले. 1973 मध्ये, त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी सुवर्णपदक मिळाले. 1989 मध्ये, 'आत्मविश्वास' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.