Nana Patekar Passes Away : दुष्काळाच्या काळोखात ‘नाम फाउंडेशन’ची मशाल पेटवणारे नाना

शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्या मुलांना मदत करण्याबरोबरच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठीही संस्थेने काम केले.

- हजारो कुटुंबांना आधार; शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीपलीकडे उभारली जलसंधारणाची चळवळ


मुंबई : अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीही तितक्याच ताकदीने जपली. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना अस्वस्थ झालेल्या नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यापासून सुरू झालेली ही वाटचाल पुढे जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत विस्तारली.


दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांना तातडीची मदत देण्याबरोबरच त्यांच्या भविष्यातील अडचणी कमी करण्यासाठी ‘नाम’ने पाणी संवर्धनावर भर दिला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, विविध जलप्रकल्प, पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन अशा उपक्रमांतून दुष्काळग्रस्त भागात दीर्घकालीन काम उभे करण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्या मुलांना मदत करण्याबरोबरच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठीही संस्थेने काम केले.



नाना पाटेकर यांनी स्वतः मराठवाड्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांना भेटी दिल्या. विदर्भातील यवतमाळसह अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधताना त्यांनी मदतीचे आवाहनही केले. त्यामुळे ‘नाम’ ही फक्त आर्थिक मदत करणारी संस्था न राहता ग्रामीण भागातील पाणी आणि शेतीच्या प्रश्नांवर काम करणारी चळवळ म्हणून पुढे आली.


‘नाम फाऊंडेशन’च्या माहितीनुसार, संस्थेच्या माध्यमातून २ हजार १८७ गावांपर्यंत मदत पोहोचली असून ५० हजार ९०८ कुटुंबांना आणि ४ हजार ९५७ विधवांना मदत करण्यात आली आहे. वीरगती प्राप्त लष्करी जवानांच्या १०२ कुटुंबांनाही आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेच्या विविध जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या संख्येने नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली.


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यापासून त्यांच्या गावात पाणी उपलब्ध करून देण्यापर्यंतचा ‘नाम’चा प्रवास नाना पाटेकर यांच्या सामाजिक जाणिवेचे वेगळे उदाहरण ठरला. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी सातत्याने उभा राहणारा एक संवेदनशील आवाज हरपला आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १२ ऑक्टोबर शेवटची संधी

मुंबई : राज्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, तसेच अपात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत

Revenue Staff Promotion : कोकण महसूल विभागात मोठा निर्णय: 39 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती!

मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या 39 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सहायक महसूल

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान केंद्र सरकारची टीम घेणार दुष्काळी भागाचा आढावा

दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन

महाराष्ट्रातील बंदर विकासाला मिळणार नवी दिशा; मंत्री नितेश राणे यांच्याकडून कृष्णापटणम अदानी पोर्टची पाहणी

राज्यातील बंदर क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि सागरी व्यापाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी

‘एमपीएससी’चे आंदोलन आता राजकीय झाले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या आधीच मान्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता

Mahila Shetkari Praman Patra : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र मुंबई : शेतीतील महिलांच्या योगदानाला ओळख