भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं निधन; धनगर आरक्षणासाठी लढणारा नेता काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे वडकुटे यांनी सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसपासून भाजपपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आणि धनगर आरक्षणासाठीचा लढा त्यांच्या निधनाने अर्धवट राहिला.

महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुटे यांचं रविवारी (२२ नोव्हेंबर) निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी X वर लिहिलं, "दिल्लीत गंभीर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राज्यसभा सदस्य रामराव वडकुटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे." हिंगोलीचे सुपुत्र, धनगर आरक्षणासाठी संघर्षरामराव वडकुटे हे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी होते.


भाजपने काही महिन्यांपूर्वीच त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण मिळावं, या मागणीसाठी ते सातत्याने लढत होते. विधान परिषद सदस्य असतानाही त्यांनी राज्य सरकारकडे ही मागणी लावून धरली होती. राज्यसभा खासदार झाल्यानंतरही त्यांनी हा मुद्दा सोडला नव्हता. परभणीत धनगर आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या रॅलीवेळी त्यांनी राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. वडकुटे यांनी १९८८ मध्ये सामाजिक जीवनाची सुरुवात केली. त्यांनी धनगर समाज उन्नती मंडळ, परभणीचे अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. हे मंडळ दिवंगत शिवाजीराव शेंडगे यांचं होतं. त्यातून त्यांनी समाजाच्या प्रश्नांवर काम करायला सुरुवात केली. नंतर सामाजिक कार्यासोबतच त्यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम केलं. २००२ ते २००५ दरम्यान त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी बकरी आणि मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळलं.






२००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २००५ मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना महानंदाचे संचालक केलं. २०१२ मध्ये पुन्हा त्यांना बकरी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आलं. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचं सदस्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. १४ ऑक्टोबर २०१९ रोजी वडकुटे यांनी राष्ट्रवादी आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष केलं. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामुळे त्यांना संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी पक्षावर विश्वास ठेवला. त्यांच्या संयमाचं फळ मार्च २०२६ मध्ये मिळालं आणि भाजपने त्यांना राज्यसभेचं उमेदवार केलं. धनगर आरक्षणाचा लढा अर्धवट ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 22 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 22 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

Shocking crime news Maharashtra: ज्याच्यासोबत बांधली लग्नगाठ, त्याच्याच हत्येचा कट! पत्नीच्या कृत्याने परिसर हादरला

लग्नाला अवघे सहा महिने झाले असतानाच एका तरुणाचा संसार दुर्दैवीरीत्या संपल्याची धक्कादायक घटना धाराशिव

Pune Camp 8 hotels license suspended : पुणेकरांनो सावधान! बाहेर खाताय ? कॅम्पमधील ८ प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची मोठी कारवाई!

पुणे : पुणे शहरातील खवय्यांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महापालिकेने

10 जानेवारीपासून जनगणना 2027 ची स्वयं-गणना; महाराष्ट्रात 25 जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण

जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी

Sugar Price Hike : महागाईचा गोडवा कडू! सणासुदीशिवायच साखरेच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे दर

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडवणारी बातमी समोर आली आहे. कोणताही सण-उत्सव

गोशाळांच्या जमीन व्यवहारांना कृषिदर लागू होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: गोशाळांचे आर्थिक बळ वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे गोशाळांसाठी जमीन