
मुंबई : आपल्या दमदार आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाना पाटेकर हे 75 वर्षांचे होते. गोव्यातील त्यांच्या घरी ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
तीव्र हृदयविकाराच्या झटक्या आल्याने निधन कार्डियाक अरेस्ट आल्यामुळे नाना पाटेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे पहाटे 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने सुमारे पाऊण तास (४५ मिनिटे) सीपीआर देऊन त्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, नियमानुसार एमएलसी (MLC) दाखल करण्यात आली असून लवकरच शवविच्छेदन पार पडेल.Veteran actor Nana Patekar passed away at 5:20 AM today after suffering a severe cardiac arrest at his residence.
Despite 45 minutes of continuous CPR, he could not be revived. A medico-legal case (MLC) has been registered, and a post-mortem will be conducted: Dr. Shekhar Salkar, Chief of Oncology Department, Manipal Hospital — ANI (@ANI) October 8, 2026
अभिनयासोबतच नाना पाटेकर सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा भूमिका मांडली होती.






