
महाराष्ट्र: पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती- जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी- इन द फूट स्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंबच आहे.
महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरपूर वारीची भक्ती मार्गातली समृद्ध परंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती- जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांनी निर्मिती केलेल्या ह्या माहितीपटाचे डिस्कवरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात आले आहे.
मुंबई: राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागतासाठी तसेच प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या राज्य सरकार 44 नवीन ...
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा जागतिक प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी 22 मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधु भावाचा संदेश भाषेच्या मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, "पंढरपूर वारी ही भक्तीमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून ती जात, धर्म, गरीब- श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी माहिती- जनसंपर्क विभागामार्फत ‘पंढरपूर वारी– इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ ही सुंदर डॉक्युमेंट्री तयार करून रिलीज करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’ मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती- जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारी माहितीपट सर्वांनी पाहावा," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या भाजपचे नेते शरद लाड यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली ...
माहिती- जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, "आशिया- पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. या बहुमानामुळे महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, संत साहित्य, सामाजिक समतेचा संदेश आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे."




