राहणीमान बदललं की विचारही बदलणार..
कपिल देव यांनी वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बोलताना सांगितलं की, कमी वयातच मिळाली प्रसिद्धीत एक तरूण खेळाडू स्वत:ला कसं सावरतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. वय आणि जीवनशैलीतील बदलामुळे विचार बदलू शकतात. कपिल देव म्हणाले की, वैभव सूर्यवंशी हा 15 वर्षांचा आहे. त्याला आणखी तीन वर्षे द्या. मग आपण बोलू.. कपिल देव यांनी पुढे सांगितलं की, 'जेव्हा त्याचं राहणीमान बदलेल, तेव्हा त्याचे विचारही बदलतील. मग पुढच्या दोन वर्षात कसा वागतो हे आपल्याला कळेल. त्याची कामगिरी पाहण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे.'
[caption id="attachment_1065252" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचच्या जेएससीए ...
वैभव सूर्यवंशीचा क्रिकेटमधील चढता आलेख
वैभव सूर्यवंशीला मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने बोली लावून आपल्या संघात घेतलं होतं. अवघ्या 13 व्या वर्षी त्याच्यासाठी बोली लागल्याने चर्चा रंगली. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. या पर्वात त्याने आपल्या आक्रमक शैलीने भल्याभल्या गोलंदाजांना फोडून काढलं. इतकंच काय तर हा फॉर्म आयपीएल 2026 मध्ये कायम राहिला. 776 धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झंझावाती खेळी केली. वैभवने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला. पण काही खास करू शकला नाही. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं. एशियन्स गेम्स स्पर्धेत खेळला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात आहे.