IND vs NZ, 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडच्या 5 बाद 246 धावा

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल येथे सुरू आहे. या सामन्याचा पहिला दिवस पार पडला असून न्यूझीलंडने 5 बाद 246 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी काय घडलं? ते जाणून घेऊयात...

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना काईस्टचर्च येथे सुरू आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलने सांगितलं की, 'प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी बऱ्यापैकी चांगली दिसतेय, थोडा ओलावा आहे. मी मागच्या सामन्यात म्हटल्याप्रमाणे, आशा आहे की पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात आपण काही धावा काढू शकू.तयारीबद्दल खरं सांगायचं तर, तयारी बरीच चांगली आहे. त्यांच्यापैकी काहींनी काल नेटमध्ये गोलंदाजी केली. ते खूप ताजेतवाने आहेत.' भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय काही अंशी योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण आघाडीचे 5 फलंदाज झपट बाद करण्यात यश आलं. पण या सामन्यातही टॉम ब्लंडल आणि ग्लेन फिलिप्स हे दोघं भारतासाठी डोकेदुखी ठरले. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 5 गडी गमवून 246 धावा केल्या आहेत. आता दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाच गडी झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.

न्यूझीलंडचा डाव


न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. डेवॉन कॉनवे 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम लॅथमने डाव सावरण्याचा प्रय्तन केला. त्याने 128 चेंडूत 6 चौकार मारत 59 धावा केल्या. त्यानंतर धडाधड तीन विकेट पडल्या. संघाच्या 110 धावा असताना हेनरी निकोल्स, रचिन रवींद्र आणि डेरिल मिचेल बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत आला होता. मात्र टॉम ब्लंडल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 122 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. भारताकडून आकाश दीपने 2, गुरनूर ब्रार आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.







दोन्ही संघांची प्लेइंग 11


न्यूझीलंडची प्लेइंग XI: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काईल जेमिसन, मॅट हेन्री, जेकब डफी.

भारताची प्लेइंग XI: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह.
Comments
Add Comment

WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊनही सिराजला बाहेरचा रस्ता; टीम इंडियाचा मोठा डाव?

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी क्राइस्टचर्चच्या मैदानावर भारतीय संघ

Asia Cup Rising Stars 2026: भारत ए संघाचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेकडून 8 गडी राखून पराभव

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. भारताला उपांत्य फेरीत

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईची धमाकेदार आगेकूच! 7 सामन्यांत 6 वा विजय; पुदुचेरी-हरियाणाचा थरार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये मुंबईच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत उत्तराखंडचा 86 धावांनी धुव्वा

IND vs NZ 2nd Test Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह? जाणून घ्या सर्व माहिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित ठरला आहे.

SMAT 2026: क्रिकेटच्या मैदानावर संतापजनक प्रकार! कृणाल पांड्यावर चाहत्याने फेकली बूटं; लाजिरवाण्या प्रसंगाचा VIDEO Viral

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एका प्रकाराने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत बडोदा आणि

टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?

क्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली