स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार दै. ‘प्रहार’चा १८ वा वर्धापनदिन सोहळा - माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, नीलम राणे, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : सत्याची धार आपल्या शब्दांतून जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळा रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दादर येथे होणार आहे. यानिमित्त ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ आणि ‘किलबिल चित्रकला स्पर्धा २०२६’ या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभही आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक नारायणराव राणे, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा नीलमताई नारायणराव राणे, दैनिक ‘प्रहार’चे संचालक तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश नारायणराव राणे आणि दैनिक ‘प्रहार’चे संचालक तथा आमदार निलेश नारायणराव राणे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.


वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने गणेशोत्सवातील उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ तसेच बालचित्रकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘किलबिल चित्रकला स्पर्धा २०२६’मधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात स्पर्धकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.


या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘अभंग रिपोस्ट’ यांचा विशेष कार्यक्रम. वर्धापनदिनाचा आनंद, विजेत्यांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Google Maps Update: गुगल मॅप्सचा लूक बदलणार! नवीन व्हिज्युअल मोडमुळे रस्ते दिसणार अधिक स्पष्ट; जाणून घ्या काय आहे खास

स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रवास करताना योग्य रस्ता शोधण्यासाठी Google Maps हे अनेकांच्या दैनंदिन वापरातील

Indian Railways News: ट्रेनचे जुने डबे आता भंगारात नाही, तर रेस्टॉरंटमध्ये! रेल्वेची कमाईची अनोखी शक्कल

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी

लग्नाआधी त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! 2 चमचे बेसनपासून तयार करा घरगुती ब्राइडल स्क्रब

लग्नसराईच्या दिवसांत होणारी नवरी तात्काळ चमक आणि सतेज त्वचा मिळवण्यासाठी काही महिने आधीपासूनच महागडे फेशियल,

Swiggy Instamart: स्विगीच्या इन्स्टामार्टमध्ये मोठी पुनर्रचना, 340 कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपल्या क्विक कॉमर्स विभाग इन्स्टामार्टमध्ये मोठी कपात करण्याचा

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात

Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम