Kalyan Traffic: नवरात्रीनिमित्त अवजड वाहनांना कल्याणमध्ये निर्बंध, 7 मार्गांवर असणार प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर सणासुदीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत.

ठाणे: कल्याण शहरामध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक वर्ग दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये दुर्गाडी किल्ल्यावर आणि परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान, कल्याण पश्चिम, भिवंडी परिसरामध्ये प्रवाशांना ये- जा करताना शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये, भाविकांची गर्दी आणि शहरातील वाहनांची गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी 7 प्रमुख मार्गांवर जड-अवजड, मल्टिएक्सल वाहने तसेच खासगी आणि शासकीय बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.



कल्याण शहरात 11 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नवरात्रोत्सव आणि दसरा हे सण दुर्गामाता मंदिर, दुर्गाडी किल्ला, कल्याण पश्चिम येथे साजरे होणार आहेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक रस्त्यावर येऊन सण साजरा करत असतात. शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणे ही बाब सामान्य नागरिकांच्या सोईसाठी आवश्यक आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा सणाच्या दिवसांमध्ये सायंकाळी 4 वाजेपासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रस्ते वाहतूक नियंत्रण अधिसुचनेमध्ये बदल केले जातील. पण अधिसुचना पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने आणि रूग्णवाहिका या वाहनांना अत्यावश्यक सेवेच्या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.




कोणकोणत्या मार्गांवर प्रवेशबंदी आहे?



  1. नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन, मुंब्रा मार्गे कल्याण नाका येथून कल्याण दिशेने पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करून नाशिक मुंबई हायवे, भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी आणि शासकीय बसेस यांना मुंब्रा वाहतूक उप विभाग हद्दीतील कल्याण नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. सर्व वाहनांना मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका नाशिक मुंबई महामार्गाने पर्यायी मार्गाने इच्छीत स्थळी जाता येणार आहे.

  2. तळोजा बायपास मार्गे खोणी निसर्ग ढाबाकडून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी आणि शासकीय बसेस यांना कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीतील खोणी निसर्ग ढाबा येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. सर्व वाहनांना बदलापूर अंबरनाथ व काटई बदलापूर चौक लोढा पलावा कल्याण फाटा या पर्यायी मार्गाने इच्छीत स्थळी जाता येणार आहे.

  3. नेवाळी नाका (विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग) कडून मलंग रोडने चक्कीनाका आणि पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी आणि शासकीय बसेस यांना नेवाळी नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. सर्व वाहनांना बदलापूर अंबरनाथ हायवे मार्गे या पर्यायी मार्गाने इच्छीत स्थळी जाता येणार आहे.

  4. श्रीराम चौक (विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग) कडून कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी आणि शासकीय बसेस यांना श्रीराम चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. सर्व वाहनांना श्रीराम चौकाकडून उल्हासनगर, शहाड, अंबरनाथ या पर्यायी मार्गाने इच्छीत स्थळी जाता येणार आहे.

  5. शहाड प्रेम ऑटो दुर्गामाता चौक कोनगाव, भिवंडी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड-अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी व शासकीय बसेस यांना आधारवाडी चौक (कल्याण वाहतूक उप विभाग) येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. सर्व वाहनांना आधारवाडी चौक येथून उजवीकडे वळून गांधारी ब्रिज बापगाव सोनाळे मार्गे इच्छित स्थळी जातील.

  6. रांजनोली नाका (कोनगाव वाहतूक उप विभाग) कडून कोनगाव मार्गे कल्याण दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड अवजड, मल्टिएक्सल वाहने, सर्व प्रकारच्या खाजगी व शासकीय बसेस यांना रांजनोलौ नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.सर्व वाहनांना रांजनोली नाका येथून मुंबई नाशिक महामार्ग खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

  7. ठाणे ग्रामीण ह‌द्दीतून बापगाव मार्गे गंधारी ब्रिजकडून कल्याण दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड, अवजड, मल्टिएक्सल वाहने, खाजगी बसेस यांना सावदनाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. मार्गावरील सर्व वाहनांना सावदनाका येथून सोनाळे मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

Comments
Add Comment

Deepika Padukone : मानसिक आरोग्यासाठी पीव्ही सिंधू आणि दीपिका पादुकोण एकत्र! ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे कपडे फक्त ८५० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि भारताची स्टार

मुंबईतील झगमगाटावर निर्बंध? प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई हे शहर दिवसरात्र गजबजलेलं असतं. रात्रीच्यावेळी मुंबईत खास करून दक्षिण मुंबई तसेच वांद्रे परिसरात झगमगते

Banganga Tank News : बाणगंगा तलावात माशांच्या सामूहिक मृत्यूनंतर खळबळ; पितृपक्षाच्या शेवटी बॅरिकेट्सच्या सावलीत पार पडले शेकडो भाविकांचे श्राद्ध

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वाळकेश्वर भागातील प्राचीन बाणगंगा तलावात (Mumbai Banganga Tank) काही दिवसांपूर्वी माशांचा

Sion railway bridge news : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सायन रेल्वे उड्डाणपूल अधिकृत उद्घाटनापूर्वीच चर्चेत; सोशल मीडियावरील रीलमुळे पालिका सतर्क

मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित आणि अतिशय महत्त्वाचा असा सायन रेल्वे उड्डाणपूल (Sion ROB) अजून लोकांच्या वापरासाठी

खाकीचा सन्मान! राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते 103 पोलीस अधिकारी व जवानांना पदके प्रदान

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील लोक भवन येथे एका दिमाखदार

Mumbai Water Supply : धरणातील गाळ काढण्याची गरज... प्रशासनाने दिलेला अभिप्राय स्थायी समितीने परत पाठवला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील गाळ काढून त्यातील पाणलोट क्षेत्र वाढवणे हे