महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.


यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उत्तम नेतृत्व व कार्यक्षमता दाखविली आहे. अडचणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा उत्साहाने आणि जबाबदारीने कामाला लागल्यास कामाचा वेग वाढतो, हे आपण अनुभवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेपासून काम सुरू असल्याचे चित्र यापूर्वी दिसले आहे. त्याच कार्यतत्परतेने आणि समर्पित भावनेने आता जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.


जलसंधारणाच्या कामांसाठी या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेत कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.






जलसंधारणाची कामे केवळ कागदावरील नियोजनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण झाली पाहिजेत. पहिला पाऊस पडताच पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल, अशा पद्धतीने कामांचे नियोजन व अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. जलसंधारणाची ही महत्त्वपूर्ण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी एकजुटीने सहभागी व्हावे आणि या मोठ्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अभिनेते आमिर खान, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 28 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; गरजू रुग्णांना मिळणार नवा आधार

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, या उद्देशाने काम करणाऱ्या मुख्यमंत्री सहायता

सहकारी साखर कारखान्यांच्या 'शासकीय कर्ज हमी'ला लगाम; 100 कोटींची मर्यादा

मुंबई : राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्य शासनाच्या हमीवर सहकारी साखर कारखान्यांना दिल्या