नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा? जाणून घ्या नऊ रूपांची आवड!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या काळात भक्त उपवास करतात आई विधीपूर्वक देवीची पूजा करतात. पूजेमध्ये भोग आई प्रसाद यांनाही विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या एका वेगळ्या रुपाला तिचे आवडते मानले जाणारे खाद्यपदार्थ अर्पण केले जातात. असे मानले जाते की भक्तिभावाने आणि नियमितपणे देवीला नैवेद्द अर्पण केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील त्रासांपासून देखील मुक्तता होते. अनेक भक्त नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे नैवेद्य तयार करून देवीला अर्पण करतात, जे नंतर देवी स्वतः सेवन करते किंवा प्रसाद म्हणून दान करते. यानिमित्ताने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या देवीला कोणते नैवेद्य अर्पण केले जातात आणि त्यामागील श्रद्धा काय आहेत जाणून घेऊया.


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला तूप अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या इच्छा पूर्ण होतात अशी समज आहे.


दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला साखर, खडीसाखर किंवा पंचामृत अर्पण केले जाते. देवी ब्रम्हचारिणीला मिठाई अर्पण केल्याने दीर्घायुष्य आणि मानसिक शांती लाभते, असा समज आहे.


तिसऱ्या दिवशी देवी चंद्राघंटाची पूजा केली जाते. या दिवशी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. देवीला विशेषतः खीर अर्पण केली जाते. असे मानले जाते की देवी चंद्रघंटाला दुग्धजन्य पदार्थ अर्पण केल्याने जीवनात सुख आणि शांती येते आणि नकारात्मक परिस्थितीतून सुटका मिळते.


चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी देवीला दिलेला मालपोआ पवित्र मानला जातो. पूजेनंतर गरजू व्यक्तींना मालपोआ दान करण्याची प्रथा आहे.



नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेला केळी अर्पण केली जातात. यामुळे ज्ञान, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. पूजेनंतर प्रसाद म्हणून केली वाटण्याची परंपरा आहे.


नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. यादिवशी देवीला मध अर्पण करण्याची परंपरा आहे. देवी कात्यायनीला मध अर्पण केल्याने जीवनात गोडवा आणि सकारात्मकता येते, अशी मान्यता आहे.


सातव्या दिवशी काळरात्री मातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला गूळ अर्पण केला जातो. यामुळे भीती आणि नाकारात्मकतेपासून मुक्ती मिळते, असा भक्तांचा विश्वास आहे. पूजेनंतर प्रसादात गूळ वाटणेदेखील शुभ मानले जाते.


अष्टमी तिथीला महागौरी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी देवीला अर्पण केलेले नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात.


नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी माता सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला हलवा, चणे, पुरी, खीर आणि पुवा यांसारखा प्रसाद अर्पण करण्याची परंपरा आहे. यानंतर, हा प्रसाद मुली, गरजू लोक आणि इतरांमध्ये वाटला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धीच्या इच्छा पूर्ण होतात.


(येथे दिलेली माहिती सामान्य मान्यतेनुसार तसेच धार्मिक गोष्टींवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहितीच्या आणि तथ्यांच्या अचूकतेसाठी किंवा पूर्णतेसाठी प्रहार जबाबदार नाही.)

Comments
Add Comment

Kerala business class bus : विमानासारख्या लक्झरी सुविधा आता बसमध्ये! केरळ सरकारच्या 'बिझनेस क्लास' बस प्रवासाची सर्वत्र चर्चा

विमान प्रवासात मिळणाऱ्या एअर होस्टेस, हाय-स्पीड वाय-फाय, मनोरंजनासाठी वैयक्तिक स्क्रीन आणि बसच्या आतच वॉशरूम

आडाचीवाडी ग्रामपंचायत ठरली महाराष्ट्रात सर्वोत्तम! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 5 कोटींचे बक्षीस

लोकसहभागाच्या जोरावर ग्रामसमृद्धीचा नवा आदर्श घालत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी

मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे होणार 'ऑडिट', माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समितीमध्ये समावेश

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि त्यांमधील कायदेशीर पेच

Old Dupatta DIY Hacks : जुने दुपट्टे फेकून देण्याची घाई करू नका! घर सजवण्यासाठी ट्राय करा या ३ सोप्या आणि भन्नाट 'डू इट युअरसेल्फ' आयडिया

महिलांच्या कपाटात (वॉर्डरोब) विविध प्रकारचे, रंगांचे आणि आकर्षक डिझाईन्सचे दुपट्टे असतात. कपड्यांची फॅशन बदलली

‘काला हिरण’ प्रकरणी महत्त्वाची अपडेट, उच्च न्यायालयाने सलमान खानकडून मागवले उत्तर

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काळवीट प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याच्या ह्या प्रकरणावर

Drishyam Home Tour: 100 वर्षे जुना अन् पोर्तुगाली स्टाईलचं घर, 'दृश्यम' मधील विजय साळगावकरचा बंगला कुठेय?

मुंबई: चांद्यापासून बांद्यापर्यंत अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची चर्चा सुरू आहे. चित्रपटातील अनेक सीन्सने आणि कथेने