Monday, October 12, 2026

चुकलंच म्हणा..! अर्शदीप सिंगने अक्षर पटेलची जाहीर माफी मागितली, झालं असं की..

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने अक्षर पटेलची माफी मागितली आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात केलेल्या चुकीसाठी त्याने माफीनामा मागितला. त्याला कारणंही तसंच आहे. नेमकं काय घडलं? ते जाणून घ्या..

वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी20 सामना भारताने 14 धावांनी जिंकला. खरं तर या सामन्यातही वेस्ट इंडिजने धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. पण अखेर भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. भारताने 20 षटकात सर्व गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावा दिल्या. खरं तर हे आव्हान अधिक असू शकलं असतं. पण अक्षर पटेल धावचीत झाला. त्याला कारण ठरला तो अर्शदीप सिंग.. आठव्या विकेसाठी अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग ही जोडी जमेल असं वाटलं होतं. या जोडीने 8 धावांची भागीदारी केली आणि अर्शदीप सिंगची एक चूक भोवली. यामुळे अक्षर पटेलचा डाव 20 धावांवर आटोपला. इंदुरमध्ये फलंदाजी करताना 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा प्रकार घडला. शमर स्प्रिंगरने अक्षर पटेलला पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला. पण त्याने कसाबसा हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ढकलला. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्याचं पाहून अक्षर पटेल जोरात 'नाही' असं म्हणाला. पण त्याचा कॉल ऐकण्यापूर्वी अर्शदीपने स्ट्राईकच्या दिशेने धाव घेतली होती. अर्शदीप सिंग स्ट्राईकच्या दिशेने धावत येत असल्याचं पाहून अक्षर पटेलकडे धावण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही फलंदाजांची गोंधळलेली स्थिती पाहून कीमो पॉलने चेंडू पटक नॉन स्ट्राईकच्या दिशेने स्प्रिंगरकडे फेकला. अक्षर पटेल क्रिजमध्ये येण्यापूर्वी बेल्स उडवल्या आणि त्याला धावचीत केलं. अक्षर पटेलची विकेट आपल्यामुळेच गेली, याची जाणी अर्शदीप सिंगला होती. त्यामुळे त्याने सामन्यानंतर अक्षरची जाहीरपणे माफी मागितली. अक्षर पटेल म्हणाला की, 'फलंदाजीबाबत म्हणायचं तर मला अक्षर भाईची माफी मागायची आहे. मी त्याला धावबाद केलं. फलंदाजीत मी प्रयत्न करत राहतो. यश क्वचितच मिळतं. पण आज चेंडू चांगला लागला. प्रशिक्षक आमच्यावर जो विश्वास दाखवतात, त्यानुसार आम्हाला फलंदाजीतही चांगली कामगिरी करून खालच्या फळीत काही धावा करणे आवश्यक आहे. म्हणूनच फलंदाजीवर काम करणे महत्त्वाचे आहे.'
अर्शदीप सिंगने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 8 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. पण गोलंदाजी कमाल केली. अर्शदीप सिंगने 4 षटकात 44 धावा देत 3 विकेट काढल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. अर्शदीप सिंग या पुरस्कारानंतर म्हणाला की, 'चेंडू थोडा रिव्हर्स होत होता, आणि डेथ ओव्हर्समध्ये थोडा रिव्हर्स होणाऱ्या चेंडूवर गोलंदाजी करणे नेहमीच मजेशीर असते, तसेच दव असताना गोलंदाजी करणेही नेहमीच आनंददायी असते. पण मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो नाही, त्यामुळे यावेळी संघासाठी चांगली कामगिरी करायची होती आणि त्याचा योग्य परिणाम मिळाला.'
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >