Monday, October 12, 2026

रणजी स्पर्धा खेळण्यात काय अर्थ आहे? दिलीप वेंगसरकर बीसीसीआयवर भडकले, संताप व्यक्त करत म्हणाले...

देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धा असताना भारतीय अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी संताप व्यक्त केला हे. इतकंच काय तर बीसीसीआयच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा आहे. मोठ्या दिमाखात या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. असं असताना भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडून घेतलेला निर्णय खटकला आहे. कारण या स्पर्धेदरम्यान भारत अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.ध्रुव जुरेलच्या नेतृत्वात भारत अ संघ 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर असेल. त्यामुळे निवड झालेले खेळाडू रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यातच खेळणार आहेत. तर या स्पर्धेच्या मोठ्या भागातून बाहेर असतील. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या मते, देशातील सर्वात मोठी फर्स्ट क्लास क्रिकेट स्पर्धा सुरू असताना शॅडो टूरचं आयोजन करणं भारताच्या देशांतर्गत क्रिकेट धक्का आहे. यामुळे भारतीय देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व कमी करत असल्याचं जाणवतं.

काय म्हणाले दिलीप वेंगसरकर?

दिलीप वेंगसरकर यांनी वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच मीडियाशी बोलताना सांगितलं की, 'जर रणजी ट्रॉफी स्पर्धेचं पर्व सुरू आहे, तेव्हा इंडिया अ दौऱ्याचं आयोजन करण्यात काय अर्थ आहे? मग रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात काही अर्थच उरत नाही. आपल्या देशांतर्गत दौऱ्यादरम्यान शॅडो टूरचं आयोजन करणं आश्चर्यकारक आहे. कारण तुम्ही असं करून आपल्या देशातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं महत्त्व कमी करत आहात.' दिलीप वेंगसरकर पुढे म्हणाले की, देशातील स्टार खेळाडू रणजी ट्रॉफी ऐवजी भारत अ संघासाठी खेळत असतील. त्यामुळे रणजी स्पर्धेत धावा करणं आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचं मूल्यांकन कमी पडतं. वेंगसरकर याने सांगितलं की, देशांतर्गत क्रिकेटच्या दरम्यान या दौऱ्याचं आयोजन करणं सजण्यापलीकडे आहे.

बीसीसीआयला दिली अशी सूचना

माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी याप्रकरणी देण्यात येणारी सर्व कारणंही फेटाळून लावली आहेत. दिलीप वेंगसरकर यांच्या मते, जर खेळाडूंना विदेश स्थितीशी आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं हे प्राधान्य असेल तर वरिष्ठ संघालात तिथे आधी पाठवायला हवं. वेंगसरकर यांनी सांगितलं की, त्या खेळाडूंना दौऱ्यावर पाठवण्यात काहीच अर्थ नाही. जे वरिष्ठ कसोटी संघाचा भाग नाहीत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >