चुकलंच म्हणा..! अर्शदीप सिंगने अक्षर पटेलची जाहीर माफी मागितली, झालं असं की..

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यापूर्वी अर्शदीप सिंगने अक्षर पटेलची माफी मागितली आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात केलेल्या चुकीसाठी त्याने माफीनामा मागितला. त्याला कारणंही तसंच आहे. नेमकं काय घडलं? ते जाणून घ्या..

वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी20 सामना भारताने 14 धावांनी जिंकला. खरं तर या सामन्यातही वेस्ट इंडिजने धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. पण अखेर भारताने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. भारताने 20 षटकात सर्व गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावा दिल्या. खरं तर हे आव्हान अधिक असू शकलं असतं. पण अक्षर पटेल धावचीत झाला. त्याला कारण ठरला तो अर्शदीप सिंग.. आठव्या विकेसाठी अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग ही जोडी जमेल असं वाटलं होतं. या जोडीने 8 धावांची भागीदारी केली आणि अर्शदीप सिंगची एक चूक भोवली. यामुळे अक्षर पटेलचा डाव 20 धावांवर आटोपला. इंदुरमध्ये फलंदाजी करताना 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा प्रकार घडला. शमर स्प्रिंगरने अक्षर पटेलला पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला. पण त्याने कसाबसा हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ढकलला. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्याचं पाहून अक्षर पटेल जोरात 'नाही' असं म्हणाला. पण त्याचा कॉल ऐकण्यापूर्वी अर्शदीपने स्ट्राईकच्या दिशेने धाव घेतली होती.

अर्शदीप सिंग स्ट्राईकच्या दिशेने धावत येत असल्याचं पाहून अक्षर पटेलकडे धावण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही फलंदाजांची गोंधळलेली स्थिती पाहून कीमो पॉलने चेंडू पटक नॉन स्ट्राईकच्या दिशेने स्प्रिंगरकडे फेकला. अक्षर पटेल क्रिजमध्ये येण्यापूर्वी बेल्स उडवल्या आणि त्याला धावचीत केलं. अक्षर पटेलची विकेट आपल्यामुळेच गेली, याची जाणी अर्शदीप सिंगला होती. त्यामुळे त्याने सामन्यानंतर अक्षरची जाहीरपणे माफी मागितली. अक्षर पटेल म्हणाला की, 'फलंदाजीबाबत म्हणायचं तर मला अक्षर भाईची माफी मागायची आहे. मी त्याला धावबाद केलं. फलंदाजीत मी प्रयत्न करत राहतो. यश क्वचितच मिळतं. पण आज चेंडू चांगला लागला. प्रशिक्षक आमच्यावर जो विश्वास दाखवतात, त्यानुसार आम्हाला फलंदाजीतही चांगली कामगिरी करून खालच्या फळीत काही धावा करणे आवश्यक आहे. म्हणूनच फलंदाजीवर काम करणे महत्त्वाचे आहे.'





अर्शदीप सिंगने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 8 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. पण गोलंदाजी कमाल केली. अर्शदीप सिंगने 4 षटकात 44 धावा देत 3 विकेट काढल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. अर्शदीप सिंग या पुरस्कारानंतर म्हणाला की, 'चेंडू थोडा रिव्हर्स होत होता, आणि डेथ ओव्हर्समध्ये थोडा रिव्हर्स होणाऱ्या चेंडूवर गोलंदाजी करणे नेहमीच मजेशीर असते, तसेच दव असताना गोलंदाजी करणेही नेहमीच आनंददायी असते. पण मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो नाही, त्यामुळे यावेळी संघासाठी चांगली कामगिरी करायची होती आणि त्याचा योग्य परिणाम मिळाला.'
Comments
Add Comment

Sai Sudharsan : दुखापतीचे सत्र कायम; न्यूझीलंड दौऱ्याआधी 'हा' महत्त्वाचा भारतीय खेळाडू जखमी

जयपूर : भारतीय क्रिकेट संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, मात्र या दौऱ्याच्या काही दिवस आधीच युवा फलंदाज साई

W, W, W..! मुंबईच्या तुषार देशपांडेचा चंदीगडला दणका, टॉप ऑर्डर फलंदाजांना एका पाठोपाठ एक धक्के

रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली असून या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने

एक वेळ अशी होती जेव्हा मी...! सारा तेंडुलकरचा फोटो शेअर करत सचिनने दिल्या शुभेच्छा

क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा आज वाढदिवस.. सारा तेंडुलकरने

Denmark Open : सिंधूला पहिल्याच फेरीत कठीण प्रतिस्पर्धी! लक्ष्य सेनचंही आव्हान सोपं नाही; कोण मारणार बाजी?

'डेन्मार्क ओपन सुपर 750' बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत असून, भारताच्या प्रमुख खेळाडूंसाठी यंदाचा ड्रॉ अत्यंत

रणजी स्पर्धा खेळण्यात काय अर्थ आहे? दिलीप वेंगसरकर बीसीसीआयवर भडकले, संताप व्यक्त करत म्हणाले...

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा आहे. मोठ्या दिमाखात या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. असं

Sunil Gavaskar on Ranji Trophy : रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष? सुनील गावसकर इंडिया A च्या वेळापत्रकावर नाराज

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकावर आणि