SIR यादीवर दावे- हरकती दाखल करण्यास मुदतवाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला SIR यादीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई: महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला अर्थात SIR यादीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जर नागरिकांचे प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसेल अशा नवमतदारांना आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. जरीही दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असली तरीही मात्र अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणेच प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतवाढीमुळे नवीन मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.



महाराष्ट्रातील मतदारांना पाठवण्यात आलेल्या नोटिसींना उत्तर देण्यासाठी आणि SIR यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हीच मुदत पूर्वी 12 ऑक्टोबरपर्यंत होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतवाढीमुळे नवीन मतदारांना दिलासा मिळाला आहे. राज्यामध्ये 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. परंतु, अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार म्हणजेच, 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.



भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे आणि हरकती सादर करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 असा राहील. शिवाय, नोटीस टप्पा आणि दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी मात्र पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 16 नोव्हेंबर 2026 रोजी म्हणजेच दिवाळीनंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार हरकती दाखल करण्यासाठी ही मुदतवाढ महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी तसेच नवमतदारांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटलांचे विद्यापीठांना कडक निर्देश

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 265 तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर

Nitesh Rane : उपलब्ध शासकीय जमिनीचा मत्स्यव्यवसायासाठी परिणामकारक वापर करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : कोकणात खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी स्वतंत्र मत्स्य बीज केंद्रे

परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; एकास अटक

मुंबई, दि. १२ : राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे

Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; अजितदादांचा वारसा पुढे नेणार, सुनेत्रा पवारांची ग्वाही

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजन उपमुख्यमंत्री तथा

Vikram Pachpute : MPSC आंदोलन विद्यार्थ्यांसाठी की रोहित पवारांच्या राजकीय लॉन्चिंगसाठी ? विक्रम पाचपुतेंचा सवाल

Vikram Pachpute : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार