सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे नंबर 1, कल्याण, दादर, पनवेल आणि मुंबई CSMTचा कितवा क्रमांक?

कायमच गजबजलेल्या आणि सर्वाधिक व्यस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकां'ची यादी जाहीर केलीये. या यादीमध्ये कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे, जाणून घेऊया...

मुंबई: कायमच गजबजलेल्या आणि सर्वाधिक व्यस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकां'ची यादी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळातील अनेक स्थानकांचा टॉप 10 यादीमध्ये समावेश झाला आहे. कोणकोणत्या रेल्वे स्थानकांचा या यादीमध्ये समावेश झाला आहे, जाणून घेऊया...


दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. भारतीय रेल नेटवर्ककडून देशभरात लोकल, मेल- एक्स्प्रेस आणि मालवाहतूक गाड्या चालवल्या जातात. दिवसभरामध्ये हजारो गाड्यांचं संचालन रेल्वेकडून केले जाते. भारतीय रेल्वेकडून 'सर्वाधिक व्यस्त रेल्वे स्थानक'ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ठाणे, कल्याण, मुंबई सीएसएमटी, पनवेल आणि दादर या स्थानकांचा टॉप 10 यादीमध्ये समावेश होतो. सर्वात व्यस्त असलेल्या स्थानकांमध्ये ठाणे स्थानकाचा पहिला क्रमांक येतो, तर दुसऱ्या क्रमांकावर कल्याण स्थानकाचा समावेश होतो.



आजही नागरिक रेल्वे प्रवासाला सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून संबोधतात. देशभरातल्या रेल्वे स्थानकांवरून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखाच्या घरात आहे. भारतीय रेल्वेकडून अलीकडेच सर्वाधिक प्रवासी वाहतूक केल्या जाणाऱ्या 100 स्थानकांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये ठाणे स्थानकावरून दिवसाला 9 कोटी 30 लाख 67 हजार 283 प्रवासी प्रवास करतात. त्या खालोखाल कल्याण स्थानकाचा समावेश आहे. कल्याण स्थानकावरून दिवसाला 8 कोटी 37 लाख 92 हजार 667 प्रवासी प्रवास करतात. तर, हावडा स्थानकावरून 6 कोटी 13 लाख 29 हजार 319 प्रवासी करतात. मुंबई CSMT स्थानक स्थानकावरून दररोज 5 कोटी 16 लाख 52 हजार 230 प्रवासी प्रवास करतात.



त्यानंतर सियालदाह स्टेशनवरून 5 कोटी 13 लाख 69 हजार 230 प्रवाशांनी, पनवेल स्थानकावरून 4 कोटी 62 लाख 58 हजार 375 प्रवाशांनी, नवी दिल्ली स्थानकावरून 3 कोटी 96 लाख 32 हजार 272 प्रवाशांनी, ताम्बरम स्थानकावरून 3 कोटी 27 लाख 85 हजार 188 प्रवाशांनी, दादर स्थानकावरून 3 कोटी 22 लाख 69 हजार 116 प्रवाशांनी आणि एम.जी.आर. चेन्नई सेंट्रल स्थानकावरून 3 कोटी 5 लाख 95 हजार 837 प्रवाशांनी दिवसाला प्रवास केला आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकावरून दिवसाला 2 कोटींहून अधिक प्रवास प्रवास करतात. भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केलेला हा आकडा खरोखर आश्चर्यचकित करणारा आकडा आहे.

Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईत सुरू होणार ‘पेटकेअर’ प्रशिक्षण संस्था, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई: पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य आणि संगोपनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने मुंबईत

Data Centers : ‘डेटा सेंटर्स’च्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास होणार

मुंबई : राज्यात डेटा सेंटर्सची संख्या आणि या क्षेत्रातील गुंतवणूक झपाट्याने वाढत असताना, या प्रकल्पांमुळे

Mumbai- Nagpur Train: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबई CSMT- नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या; पाहा वेळापत्रक

मुंबई: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनारा आता स्वच्छ, प्रत्येक दिवशी स्वच्छतेवर केला जाणार सुमारे 42 हजार रुपयांचा खर्च

मुंबईतील वरळी किनारपट्टीची स्वच्छता न होत नसल्यामुळे मागील नारळी पोर्णिमेच्या दिवशी शिवसेना नेते खासदार

BMC News : महापालिकेच्या दादर हॉकर्स प्लाझामध्ये अनधिकृत बांधकाम, चक्क जिन्याखाली उभारले पक्के गाळे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फेरीवाल्यांचे कायम आणि सुरक्षितपणे पुनर्वसन करता यावे म्हणून दादरला हॉकर्स

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी