Ratnagiri incident : रत्नागिरीत खाडीत बुडून एकाच कुटुंबातील 4 मुलांचा मृत्यू; एका मुलीचा शोध सुरू

या घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आईसोबत खाडीत कालवे, मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेली पाच मुले खोल पाण्यात बुडाली. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला असून, एका 15 वर्षीय मुलीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाणार इंगळवाडी येथील जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह खाडीत गेल्या होत्या. खाडीत मुळे आणि शिंपले काढत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाचही मुले खोल पाण्यात बुडाली. या घटनेने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


या दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर, जुहेरिया भाटकर, बुशिरा भाटकर आणि माहिरा भाटकर या मुलांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. यापैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 15 वर्षीय माहिरा भाटकर या मुलीचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाण्यात बुडालेल्या पाच मुलांपैकी एका लहान मुलीला वाचवण्यात यश आले आहे.


घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मुलांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. खाडीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीमुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.


एकाच कुटुंबातील मुलांवर काळाने घाला घातल्याने नाणार इंगळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

MPSC News : MPSC आयोगाचे अध्यक्ष भीमनवार रजेवर; असं घडलं सर्वकाही

पुणे : एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने

BMC News : महापालिकेच्या दादर हॉकर्स प्लाझामध्ये अनधिकृत बांधकाम, चक्क जिन्याखाली उभारले पक्के गाळे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फेरीवाल्यांचे कायम आणि सुरक्षितपणे पुनर्वसन करता यावे म्हणून दादरला हॉकर्स

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी

BMC : मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील कारवाई होणारच, पण तक्रारनिहाय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील बांधकामांवरील कारवाईची घोषणा महापालिकेच्यावतीने

BMC : अतिक्रमणे हटवलेली नसताना प्रशासनाने केला अतिक्रमणमुक्त रस्त्यांचा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने अनधिकृत बांधकामे हटवल्याने पी दक्षिण आणि

Maharashtra Weather : घामाच्या धारा आणि उकाड्याने महाराष्ट्र तापला,उष्णतेमुळे नागरिक हैराण!

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.