Gold Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण, ग्राहकांना दिलासा

सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Gold Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सलग दोन दिवस दरवाढ झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत बाजारात दर घसरले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले


जळगावच्या सराफा बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात १०३ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ५४ हजार ८०९ रुपयांवर पोहोचला होता. मात्र, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात १,०३० रुपयांची घसरण झाली. यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५३ हजार ७७९ रुपयांवर आला.



चांदीच्या दरातही घसरणीची नोंद


चांदीच्या बाजारातही दरातील चढ-उतार कायम आहेत. शनिवारी १०३० रुपयांची वाढ झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह २,३१,७५० रुपयांपर्यंत पोहचली होती. मात्र, सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १०३० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३१,७५० रुपयांपर्यंत खाली आली.







आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी तेजीत


भारतीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याचा दर ०.२४ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,२२६.४० डॉलरवर पोहोचला. तर चांदीचा भाव ०.३७ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ६१.२७५ डॉलरवर व्यवहार करत होता. जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील बदल, औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल यांचा सोने-चांदीच्या किमतींवर परिणाम होत असतो. याशिवाय, भारतीय बाजारातील दरांवर रुपया-डॉलर विनिमय दर, आयात शुल्क, स्थानिक मागणी आणि इतर खर्चांचाही प्रभाव पडतो.



दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे दरांकडे लक्ष


नवरात्रोत्सव, सणासुदीचा काळ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दरातील प्रत्येक बदल महत्त्वाचा ठरत आहे. दरात झालेली घसरण खरेदीसाठी अनुकूल संधी ठरू शकते; मात्र पुढील काळात किमती कशा बदलतील, याबाबत अनिश्चितता कायम आहे. ग्राहकांनी दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासावेत. तसेच सोन्याची शुद्धता, घडणावळ, जीएसटी आणि इतर लागू शुल्क लक्षात घेऊन अंतिम किंमत निश्चित करावी.

Comments
Add Comment

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

RBI New Rules : ATMमधून वारंवार पैसे काढताय? वर्षाला 1,600 रुपयांहून अधिक शुल्क लागू शकते; RBIचा नवा नियम काय?

RBI New Rules :  एटीएममधून वारंवार पैसे काढणे किंवा बॅलन्स तपासणे यामुळे तुमचा बँकिंग खर्च वाढू शकतो. मोफत व्यवहारांची

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.