Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, "रामायण " दिसणार आता 40 भाषांमध्ये

रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत

मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40 भाषांमध्ये प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पौराणिक कथांचा जगभरात प्रसार करण्याच्या हेतूने हा महत्वाचा प्रयत्न मानला जात आहे.(RAMAYAN)




नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट भव्य स्वरूपात तयार करण्यात असून या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, पौराणिक कथा आणि प्रभू श्रीराम यांची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 'बॉलिवूड हंगामा' ने दिलेल्या वृत्तानुसार, रामायण चित्रपट जवळपास 40 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाषांतर आणि डबिंग केल्यामुळे विविध देशांतील प्रेक्षकांना त्यांच्या माहिती असलेल्या भाषेत हा चित्रपट पाहता येऊ शकतो.चाहते रणबीर कपूरच्या 'रामायण' ची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी जवळचा चित्रपट गृहात प्रकाशित होणार आहे. चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग 20 ऑक्टोबर पासून म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. निर्माते आणि चाहते चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत दिसून येत आहेत. चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांना पर्यंत पोहचावा आणि समजण्यास योग्य जावा यासाठी हा चित्रपट 40 भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे.(SAI PALLAVI, RANBIR KAPOOR)



फिल्म ची उत्तम अशी स्टारकास्ट

नमित मल्होत्रा ​​या चित्रपटाचे निर्माते असून, नितेश तिवारी दिग्दर्शक आहेत. रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ते प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साई पल्लवी या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत प्रेकशकांचा भेटीला येणार असून, रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याचे खूप कौतुक होत आहे. यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत असून, त्यांचा रावणाचा लूकचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय, रकुल प्रीत सिंह, अरुण गोविल, लारा दत्ता हे कलाकार सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह यांचा लुक मुळे त्याना ट्रोल सुद्धा करण्यात आले.


हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मलयाळम सह आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच "रामायण पार्ट 2 " हा पुढचा दिवाळीला म्हणजेच दिवाळी 2027 मध्ये प्रकाशित होणार आहे. आता प्रेक्षक वर्ग चित्रपट पाहण्यास आणि बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


 

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिस गाजवायला एकता कपूरचा The Dirty Picture चा सीक्वेल येतोय, मुख्य भूमिकेत विद्या बालन की आणखी कोण?

मुंबई: विद्या बालनच्या गाजलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली

Sunny Deol अंत से आरंभ तक...' सनी देओलच्या ॲक्शन चित्रपटाची घोषणा, 'सुर्या'मधील लूकने वेधलं लक्ष

मुंबई : सनी देओल यांनी आजपर्यंत घायल, दामिनी, बॉर्डर, गदर: एक प्रेम कथा, गदर 2, बॉर्डर 2 यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.

Amitabh Bachchan Birthday: "यांच्या जागी नाना पाटेकर असते तर..." वाढदिवशी बिग बींचं कृत्य पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं?

मुंबई : काल 11 ऑक्टोबर रोजी, अमिताभ बच्चन यांनी आपला 84 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या

आधुनिक विचार, नात्यांची गंमत अन् भावनांचा सुंदर मेळ असलेल्या ‘लग्न आणि बरंच काही’चा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित!

वेदांती चंद्रकांत दाणी दिग्दर्शित, नाद स्टुडिओस प्रस्तुत आणि अव्यान आर्ट्स आणि म्हाळसा एंटरटेनमेंट निर्मित

Marathi actor madhutai kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन, मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा शोककळा

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन. १२ ऑक्टोबर २०२६ ला

‘काला हिरण’ प्रकरणी महत्त्वाची अपडेट, उच्च न्यायालयाने सलमान खानकडून मागवले उत्तर

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान काळवीट प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याच्या ह्या प्रकरणावर