Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनारा आता स्वच्छ, प्रत्येक दिवशी स्वच्छतेवर केला जाणार सुमारे 42 हजार रुपयांचा खर्च

आता यासाठी पुढील दोन वर्षांकरता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईतील वरळी किनारपट्टीची स्वच्छता न होत नसल्यामुळे मागील नारळी पोर्णिमेच्या दिवशी शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी येथील किनारपट्टीवरील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आपण यासाठी स्वत: पुढाकार घेऊ असे आश्वासन स्थानिक रहिवाशांना देण्यात आल्यानंतर आता येथील वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता यासाठी पुढील दोन वर्षांकरता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कंत्राट कामाला मंजुरी देण्यापूर्वी प्रशासनाने आपल्या अधिकारात काही लाखांचे काम देवून हा समुद्र किनारा स्वच्छ राखण्याच्या दृष्टीकोनातून कामालाही सुरुवात केली आहे. या स्वच्छतेच्या कामासाठी प्रतिदिन सुमारे ४२ हजार रुपये मोजले जाणार आहेत.


महापालिकेच्या जी/दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा समुद्र किना-याची लांबी ३.५ कि.मी. आणि रूंदी ३०० मीटर एवढी आहे. या समुद्र किना-यावर जमा होणाऱ्या कच-याची मुख्यत्वे गाळ, माती, डेब्रीज मिश्रीत कचरा इत्यादीचे प्रमाण वाढल्याने इथे या जमा होणा-या कच-याचे नियमितपणे साफसफाई करावी लागते. वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यावर जमा होणा-या कचऱ्यामध्ये मुख्यत्वे संमित म्हणजेच गाळ, माती, डेब्रीज मिश्रीत कचरा (एमएसडब्लू) यांचे प्रमाण असून हा कचरा मनुष्यबळ, स्कीड स्टीयर लोडर मशीन व ई-ऑटो वाहनांद्वारे जमा करून पुढील विल्हेवाट लावण्याकरिता क्षेपणभूमी येथे वाहुन नेण्यात येणार आहे.


prahaar.in/2026/10/12/mpsc-commission-chairman-bhimanwar-on-leave-here-is-how-it-all-unfolded/

या समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेच्या कामासाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह ३.१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या स्वच्छतेसाठी प्रतिदिन ४१ हजार ८०९ रुपये खर्च केले जाणार असून मागील वेळेस प्रतिदिन ३८ हजार ००७ रुपये एवढे रुपये मोजले जात होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील बहतेक समुद्र किनारे ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. परंतु, काही समुद्र किना-यांवर मासेमारी व्यवसाय प्रामुख्याने करण्यात येतो. या समुद्र किना-यांची स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपविण्यात आली आहे. या किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय, समुद्र किना-यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत असते. त्याच बरोबर समुद्राच्या लाटामार्फत येणारा तरंगता कचरा समुद्र किनाऱ्यावर जमा होत असतो. त्यामुळे या समुद्र किनाऱ्यांची साफ सफाई वेळोवेळी करणे गरजेचे आहे. त्यानुसार पहिले कंत्राट संपुष्टात आल्यानंतर यासाठी नव्याने निविदा मागवून पात्र कंपनीची निवड या स्वच्छतेच्या कामांसाठी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बॉक्स ऑफिस गाजवायला एकता कपूरचा The Dirty Picture चा सीक्वेल येतोय, मुख्य भूमिकेत विद्या बालन की आणखी कोण?

मुंबई: विद्या बालनच्या गाजलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली

Mumbai News: मुंबईत सुरू होणार ‘पेटकेअर’ प्रशिक्षण संस्था, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई: पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य आणि संगोपनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने मुंबईत

Data Centers : ‘डेटा सेंटर्स’च्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास होणार

मुंबई : राज्यात डेटा सेंटर्सची संख्या आणि या क्षेत्रातील गुंतवणूक झपाट्याने वाढत असताना, या प्रकल्पांमुळे

Mumbai- Nagpur Train: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबई CSMT- नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या; पाहा वेळापत्रक

मुंबई: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य

BMC News : महापालिकेच्या दादर हॉकर्स प्लाझामध्ये अनधिकृत बांधकाम, चक्क जिन्याखाली उभारले पक्के गाळे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) फेरीवाल्यांचे कायम आणि सुरक्षितपणे पुनर्वसन करता यावे म्हणून दादरला हॉकर्स

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी