BMC News : महापालिकेच्या दादर हॉकर्स प्लाझामध्ये अनधिकृत बांधकाम, चक्क जिन्याखाली उभारले पक्के गाळे

अनधिकृत गाळे तोडण्याची मनसेची मागणी, अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाकडेही वेधले प्रशासनाचे लक्ष

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


फेरीवाल्यांचे कायम आणि सुरक्षितपणे पुनर्वसन करता यावे म्हणून दादरला हॉकर्स प्लाझामध्ये बांधकाम करण्यात आले आहे. सध्या या हॉकर्स प्लाझामध्ये अनेक फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्यामध्ये भाजीपासून कपड्यापर्यंतच्या व्यवसाय केला जात आहे. परंतु, येथील तळ मजल्यापासून प्रत्येक मजल्यावर अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जात नसून यात कहर म्हणजे


आता येथील जिन्याच्या खालील मोकळ्या जागेत गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम खुलेआम केले जात आहे. याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत मनसेचे नगरसेवक आणि जी उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी येथील सर्व अनधिकृत गाळे त्वरीत तोडून अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले जावे अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली.


स्थायी समितीच्या बैठकीत यशवंत किल्लेदार यांनी महापालिका प्रशासन आपल्याच वास्तूमध्ये अनधिकृत होत बांधकाम करत आहे तसेच अग्निसुरक्षा नियमांना हरताळ फासत आहे असा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. दादर परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हॉकर्स प्लाझाची उभारणी करण्यात आली. मात्र आज या वास्तूमध्ये प्रकल्प बाधित कमर्शियल गाळेधारकांचे पुनर्वसन केले जात आहे. बाहेरच्या दुकानदारांना गाळ्यांचे वाटप केले जात आहे. मात्र हे करत असतानाच आता चक्क जिन्याच्या खालील जागेमध्ये पक्क बांधकाम करून तिथे दुकान उभारली जात आहेत. अशा प्रकारे जिन्याखाली दोन ते तीन दुकाने आणि या व्यतिरिक्त वरच्या प्रत्येक मजल्यावर अनधिकृत गाळ्यांची उभारणी केली जात आहेत. या हॉकर्स प्लाझाच्या मंजूर आराखडा व्यतिरिक्त अतिरिक्त गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. महापालिका प्रशासन आणि त्यांचे बाजार विभागाचे अधिकारी यांच्या वरदस्ताशिवाय हे अनधिकृत बांधकाम होवू शकत नाही असे सांगत सर्वप्रथम या हॉकर्स प्लाझा मध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जेवढे म्हणून गाळे बांधले आहेत, ते सर्व अनधिकृत गाळे तात्काळ तोडण्यात यावेत अशी मागणी केली.


तसेच या ठिकाणी अग्नी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. हॉकर्स प्लाझामध्ये गाळेधारकांना आपण जे स्टॉल दिलेले आहेत. तेथील मोकळ्या जागांमध्ये अशा प्रकारे सामान ठेवलं जातं की , तिथून खरेदी करणाऱ्या व्यक्तीला, नागरिकाला आतमध्ये शिरताही येत नाही. त्यामुळे जर एखादी आगीसारखी दुर्घटना तिथे दिवसा घडल्यास तिथून नागरिकांना बाहेर पडणं कठीण होऊन जाईल. तसेच या ठिकाणी कपड्यांची अधिक दुकाने असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरू शकते. त्यामुळे या ठिकाणी अग्नी सुरक्षा नियमांचे पालन करून प्रत्येक दुकानदाराने येण्या जाण्यासाठी जी जागा आहे, ती मोकळी ठेवणे बंधनकारक करण्यात यावी. जेणेकरून तिथे खरेदीला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या जिविताचे रक्षण करणे शक्य होईल.


त्यामुळे हे अनधिकृत गाळे त्वरीत तोडले जावेत, तसेच या गाळे बांधण्याच्या प्रकरणाची चौकशी केली जावी. याशिवाय अग्नि सुरक्षेच्या नियमांचं योग्य प्रकारे पालन करण्यात यावी अशी मागणी किल्लेदार यांनी समितीत उपस्थित हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली.

Comments
Add Comment

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांसह आरोग्य सुविधा पीपीपी मॉडेलवर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी

BMC : मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील कारवाई होणारच, पण तक्रारनिहाय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपड्यांच्या १४ फुटांवरील बांधकामांवरील कारवाईची घोषणा महापालिकेच्यावतीने

BMC : अतिक्रमणे हटवलेली नसताना प्रशासनाने केला अतिक्रमणमुक्त रस्त्यांचा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाने अनधिकृत बांधकामे हटवल्याने पी दक्षिण आणि

मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे होणार 'ऑडिट', माजी खासदार राहुल शेवाळे यांचा समितीमध्ये समावेश

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि त्यांमधील कायदेशीर पेच

Saba Pataudi: सैफ अली खानची बहिण 27 व्या वर्षी ब्रेन ट्युमरची शिकार; म्हणाली, ‘चालता- चालता अचानक...’

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पटौदी हिने अलीकडेच तिच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला

मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण करणार; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : मुंबई शहरातील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती