वेस्ट इंडिजने भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना गमावला, पण नोंदवला ऐतिहासिक विक्रम

वेस्ट इंडिजला तिसऱ्या सामन्यात पराभूत करून भारताने टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा या सामन्यात पराभव झाला,पण एक मोठा विक्रम नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिज हा जगातील पहिला देश ठरला आहे.

1/5 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 14 धावांनी पराभूत केलं. भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केलं आणि मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. असं असलं तरी वेस्ट इंडिजने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: ANI)

2/5 तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी एकूण 13 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात वेस्ट इंडिजचे 2000 षटकार पूर्ण झाले आहेत. अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिज हा जगातील पहिला संघ ठरला आहे.दोन वेळा टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: ANI)

3/5 तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक षटकार मारण्याची स्पर्धा सुरू होती. कॅरेबियन फलंदाजांनी या सामन्यात 13 षटकार मारत 2000 षटकारांचा पल्ला गाठला. (Photo: ANI)

4/5 भारतीय संघ षटकारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 1997 षटकार मारले आहे. आता चौथ्या टी20 सामन्यात भारताने तीन षटकार मारले तर 2000 षटकारांचा पल्ला गाठणारा दुसरा संघ ठरेल. (Photo: ANI)

5/5 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज संघआच्या आसपास कोणी नाही. या यादीत तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा सघ आहे. न्यूझीलंडच्या नावावर 1585 षटकार आहेत. म्हणजेच भारत आणि वेस्ट इंडिज संघ खूप पुढे निघून गेला आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला