दुसऱ्या टी20 सामन्यातील पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर शानदार विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 223 धावांचा यशस्वी बचाव केला आणि मालिकेत जोरदार पुनरागमन केले.
October 11, 2026 10:46 PM
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी20 सामना इंदुरच्या होळकर मैदानात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. भारताचे आघाडीचे काही फलंदाज फेल गेले. पण अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी डाव सावरला. भारताने 20 षटकात सर्व गडी गमवून 223 धावा केल्या. तसेच विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सुरूवातीला धक्के बसले. भारताने दिलेल्या 224 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 209 धावांपर्यंतच पोहोचू शकला. भारताने हा सामना 14 धावांनी जिंकला. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता दोन सामने शिल्लक असून भारताने दोन पैकी एक सामना जिंकला की मालिका खिशात घालणार आहे. तर वेस्ट इंडिजला दोन पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे.
वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शे होप अवघ्या 5 धावांवर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कमिल पूरन 42 आणि शिमरॉन हेटमायर 43 यांनी डावाला गती देण्याचा प्रयत्न केला. हे नमन धिरने या दोघांनाही बाद करत विंडीजला मोठे धक्के दिले. कर्णधार रोव्हमन पॉवेल केवळ 5 धावांवर अक्षर पटेलचा शिकार ठरला. मधल्या फळीत शेरफेन रदरफोर्डने32 धावा आणि क्वेंटिन सॅम्पसनने 21 धावा करून संघर्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. केमो पॉल 10 धावा करून अर्शदीप सिंगचा तिसरा बळी ठरला. अंतिम षटकांमध्ये शमार स्प्रिंगरने अवघ्या 11 नाबाद 35 धावांची झंझावाती खेळी केली, तर रोस्टन चेस 5 धावांवर नाबाद राहिला. मात्र, तोपर्यंत विजयाचे अंतर पार करणे विंडीजला शक्य झाले नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने 3 गडी तर नमन धिरने 2 गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दिलेल्या 249 धावांच्या अजस्र लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिजने लीलया पार केला. वेस्ट इंडिजने 9 ...
भारताचा डाव
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 223 धावांचा डोंगर उभारला. भारताच्या या आक्रमक डावाचा मुख्य शिलेदार ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याने अवघ्या 30 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 69 धावांची वादळी खेळी केली. त्याला इशान किशनने 18 चेंडूंत 37 धावा करत उत्तम साथ दिली. मात्र, संजू सॅमसन 3 आणि कर्णधार श्रेयस अय्यर 1 धाव करत स्वस्तात बाद झाल्याने भारताला सुरुवातीला काही धक्के बसले. मधल्या फळीत तिलक वर्माने 28, नितीश कुमार रेड्डीने 21 आणि अक्षर पटेलने 20 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. डावाच्या अखेरीस प्रिन्स यादवने 6 चेंडूत नाबाद 13 धावा कुटून भारताला 220 चा टप्पा पार करून दिला. वेस्ट इंडिजकडून शमार स्प्रिंगर आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.