अफगाणिस्तानचा दुसरा डाव
विजयासाठी दिलेल्या 478 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 3 धावा असताना पहिला धक्का बसला. अब्दुल मलिक 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर शाहिदुल्लाह कमालची विकेट 28 धावा असताना पडली. त्यामुळे अफगाणिस्तानवर दडपण वाढलं.पण तिसऱ्या विकेटसाठी रहमत शाह आणि सेदिकुल्लाह अटल यांनी 82 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण संघाच्या 110 धावा असताना रहमत शाह बाद झाला. दुसऱ्या बाजूने सेदिकुल्लाह अटलने किल्ला लढवला. इतकंच काय तर इक्रम अलीखिल, इसमत आलम, हशमतुल्लाह शाहिदी यांच्यासोबत भागीदारी करत डाव पुढे नेला. सेदिकुल्लाह अटलने332 चेंडूत 111 धावा केल्या आणि बाद झाला. त्याच्या या झुंजार खेळीमुळे बांगलादेशचा विजय दूर गेला. पण तळाच्या बॅटर्सनी चिवट खेळी केली. कैस अहमदने नाबाद 49 धावांची खेळी केली. तर यामिन अहमदजाई यांची साथ मिळाली.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना डरबनच्या किंग्समीड मैदानात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 214 धावांनी जिंकला आहे. यासह ...
बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास म्हणाला की, 'आम्हाला सामना जिंकायचा आहे, पण क्रिकेट असेच चालते. अफगाणिस्तान खूप छान खेळला. खेळपट्टी थोडी सपाट असली तरी, ज्याप्रकारे त्यांनी चांगली फलंदाजी केली.' सामना अनिर्णित राखण्यासाठी अफगाणिस्तानने केलेला हा एक शानदार बचावात्मक प्रयत्न होता. बांगलादेश खरं तर विजयाचा प्रबळ दावेदार होता, पण महत्त्वाच्या क्षणी झेल सोडले आणि क्षेत्ररक्षणाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.