बारामतीच्या सहकारात पुन्हा पवार कुटुंबाची चर्चा; सोमेश्वर कारखान्याच्या निकालानंतर सुनील तटकरे काय म्हणाले?

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीतील विजयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुंबई : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अखेर 'फोटोफिनिश' यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विचारांची आणि बारामतीतील विकासाची पकड कायम असल्याचे या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.



सुनेत्रा पवार आणि जय पवार यांचे नेतृत्व


खासदार सुनील तटकरे यांनी विजयानंतर बोलताना सांगितले की, "दादांची स्फूर्ती आणि राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कणखर नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या संपूर्ण निवडणुकीदरम्यान जय पवार यांनी विशेष मेहनत घेतली असून, बारामतीतील सर्व सहकाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे." तटकरे यांनी या विजयाबद्दल सुनेत्रावहिनी, जय पवार आणि सर्व विजयी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



ऊस उत्पादक सभासदांचा अभूतपूर्व विश्वास


सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक विविध राजकीय कारणांमुळे आणि चर्चांमुळे राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत विविध प्रकारची राजकीय भाकितेही वर्तवण्यात आली होती. मात्र, या सर्व वावड्या बाजूला सारत बारामतीमधील ऊस उत्पादक आणि सभासदांनी पुन्हा एकदा सहकार महर्षींच्या विचार आणि नेतृत्वावर आपलागाढ विश्वास दाखवला आहे, असे समाधान तटकरे यांनी व्यक्त केले.



'कोणाला शह मिळाला' यापेक्षा दादांचे विचार महत्त्वाचे


पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, "या निवडणुकीत नेमका कोणाला शह मिळाला किंवा कोणाचा पराभव झाला, यापेक्षा स्वर्गीय दादांप्रती लोकांच्या मनात असलेल्या भावना आणि वहिनींचे कणखर नेतृत्व या विजयाच्या मागे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावून गेले आहे." स्वर्गीय दादांनी बारामतीत निर्माण केलेली पकड त्यांच्या निधनानंतरही कायम असून, पोटनिवडणुकीत जसा विक्रम झाला होता, तसाच कित्ता या सहकार निवडणुकीतही गिरवला गेला आहे, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

Comments
Add Comment

ICC Player of the Month: शुभमन गिलचा विक्रम! शफाली वर्माचीही बाजी; भारताचा डबल धमाका

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारांची घोषणा केली

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे

Jailer 2: रिलीजच्या आधीच Jailer 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ‘टॉक्सिक’सह चार चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

टॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रदर्शित होणाऱ्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची सध्या फ्यान्स विश्वात जोरदार

उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Navratri 2026 : शारदीय नवरात्री २०२६ : जिथे ३६५ पैकी ३६० दिवस बँक लॉकरमध्ये आराम करतात माता दुर्गा; ४०० वर्षे जुनी परंपरा!

कोलकाता : पश्चिम बंगालमधून नवरात्रीच्या काळात एक अत्यंत आश्चर्यकारक आणि कुतूहल निर्माण करणारी बातमी समोर आली