Pratap Sarnaik : एलॉन मस्क यांच्या टेस्लाला दिलेल्या सवलतींचा आढावा घेणार - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

२०२५ मध्ये भारतात विकल्या गेलेल्या टेस्लाच्या एकूण वाहनांपैकी सुमारे ३३ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा होता.

पंतप्रधान मोदींबद्दलच्या ट्वीटमुळे भावना दुखावल्या


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘प्राईम मिनिस्टर अंबानी’ असा उल्लेख करणाऱ्या एलॉन मस्क यांचा निषेध नोंदवत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्लाला दिलेल्या सवलतींचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. देशाच्या नेतृत्वाचा सन्मान व्यावसायिक हितापेक्षा महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करताना, महाराष्ट्राचे आणि देशाचे हित लक्षात घेऊन 'टेस्ला'ला दिलेल्या सवलतींचा पुनर्विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये भारतात विकल्या गेलेल्या टेस्लाच्या एकूण वाहनांपैकी सुमारे ३३ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा होता.


भारताच्या सर्वोच्च नेतृत्वाचा आणि लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे हे कोणत्याही व्यावसायिक हितापेक्षा महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी ही भूमिका मांडताना, आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू असलेल्या शून्य टक्के रस्ते करसवलतीसह संबंधित धोरणांचा नियमानुसार आढावा घेण्याचे संकेत दिले. या सवलती तातडीने रद्द करण्याची घोषणा त्यांनी केलेली नसली, तरी महाराष्ट्राचे आर्थिक हित आणि देशाचे व्यापक हित लक्षात घेऊन त्यांचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, टेस्लाच्या भारतातील विक्रीत महाराष्ट्राचा मोठा वाटा राहिला असून, २०२५ मध्ये देशात विकल्या गेलेल्या २२६ वाहनांपैकी १४० वाहने महाराष्ट्रातील होती.



मस्क यांनी ९ ऑक्टोबर रोजीच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘प्राईम मिनिस्टर अंबानी’ असा उल्लेख केला. त्यावर आक्षेप घेत सरनाईक यांनी अशी टिप्पणी खेदजनक असल्याचे म्हटले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या देशाच्या नेतृत्वाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी वक्तव्ये स्वीकारली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात आणि महाराष्ट्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत; मात्र या संधींचा आधार परस्पर सन्मान, विश्वास आणि जबाबदारी हा असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.


सरनाईक यांनी दिलेल्या माहितीवारीनुसार, २०२५ मध्ये भारतात टेस्लाच्या २२६ वाहनांची विक्री झाली. त्यापैकी १४० वाहने महाराष्ट्रात विकली गेली. त्यामुळे देशातील एकूण विक्रीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६२ टक्के होता. २०२६ मध्ये आतापर्यंत देशात टेस्लाच्या ८५९ वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातील २८२ वाहने महाराष्ट्रातील आहेत. यानुसार, देशातील एकूण नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे ३३ टक्के आहे.



करसवलतींचा आढावा घेणार


आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना लागू असलेल्या शून्य टक्के रस्ते करसवलतीचा आढावा घेताना प्रचलित धोरणे, कायदेशीर तरतुदी, राज्याचे आर्थिक हित आणि देशाचे व्यापक हित विचारात घेतले जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टई यशस्वी, नागपूर भाजपातील बंड शमले

- बंडखोर अनिल सोलेंची माघार; गिरीश व्यास यांचाही राजीनामा मागे मुंबई : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या

Malad Accident : मुंबईत भीषण अपघात : मालाडमध्ये रिक्षा आणि बाईकच्या धडकेनंतर बसखाली आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम (Malad West) येथील मार्वे रोडवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव

Eknath Shinde : दिल्लीतील मोर्चामागे परकीय शक्तींचा हात - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर निशाणा मुंबई : दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेल्या

Nana Patekar : ‘आठवणीतले नाना’ कार्यक्रमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या कलाप्रवासाची आठवण जागवण्यासाठी मुंबईत ‘आठवणीतले नाना’ या विशेष

Nashik Crime : नाशिकमध्ये जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या समतानगर आणि राहुल नगर परिसरात मारहाणीची गंभीर घटना

Prithvi Shaw relationship : ‘माझी दिशाभूल झाली होती!’ साखरपुडा मोडल्यानंतर पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल पुन्हा एकत्र; नेमकं काय घडलं?

Prithvi Shaw relationship : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आकृती अग्रवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.