काय आहे नियम स्टीवर्ट यांच्या भाषेत
एमसीसी अध्यक्ष फ्रेजर स्टीवर्ट यांनी सांगितलं की, ज्युनिअर काउंटी सामन्यात एका फलंदाजाने शॉट्स खेळला. हा चेंडू नॉन स्ट्राईकर एन्डला असलेल्या स्टम्पवर जोरात लागला. त्यानंतर हा चेंडू त्या स्टम्पला लागून रिव्हर्स खेळाडूच्या दिशेने घरंगळत आला.तेव्हा फलंदाजाचं लक्ष नव्हतं. हा चेंडू स्ट्राईकला असलेल्या स्टम्पवर जोरात लागला आणि बेल्स पडल्या. त्यामुळे त्याला त्रिफळाचीत दिलं गेलं. क्रिकेटच्या जुन्या नियमानुसार खेळाडू त्रिफळाचीत होता. पण आता या नियमात बदल केला आहे. आता असा प्रकार घडला तर बाद दिलं जाणार नाही. खरं तर अशा पद्धतीने बाद होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण शक्यता पाहता एमसीसीने या नियमात बदल केला आहे.
[caption id="attachment_1065924" align="aligncenter" width="800"] आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात केलेल्या ...
A small but curious change to the bowled law 📝 https://t.co/Y8t4kZGtRs
— Cricinfo (@cricinfo) October 12, 2026
एमसीसीने या नियमातही केला बदल
एमसीसीने क्रिकेटच्या नियमात अनेक बदल केले आहेत. या नियमाची 1 ऑक्टोबर 2026 पासून अमलबजावणी केली जात आहे. फलंदाजाने चेंडू खेळण्यास जाणीवपूर्वक उशीर केला तर त्याला दोन वेळा समज दिली जाईल. पण तिसऱ्यांदा तीच चूक केली तर पाच धावा पेनल्टी म्हणून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिल्या जातील. दोन कर्णधारांच्या सहमतीने कसोटीत पिंक बॉल वापरण्याची परवानगी असले. कसोटी सामन्याच्या दिवसाच्या शेवटच्या षटकात कोणी फलंदाज आऊट झाला तर खेळ तिथेच थांबवला जाणार नाही. तर नवा फलंदाज फलंदाजीला येईल. असे अनेक नियम एमसीसीने बदलले आहेत.