
मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम (Malad West) येथील मार्वे रोडवर एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव बेस्टमधून (BEST Bus) प्रवास करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा बसच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच प्राण गेले. सैफुल वैद्य (Saiful Vaidya) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, तो मोटारसायकलवर मागे बसला (Pillion Rider) होता. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रकरणी मालवणी पोलिसांनी बसचालक ५१ वर्षीय दिलीप रामपालत विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
नेमकी घटना कशी घडली ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून या अपघाताचे नेमके कारण समोर आले आहे. मार्वे रोडवरून जात असताना अचानक एका रिक्षाने कोणतीही पूर्वकल्पना न देता उजव्या बाजूला वळण घेतले. यामुळे मागून येणारी मोटारसायकल थेट त्या रिक्षावर आदळली. या अचानक झालेल्या धडकेमुळे बाईकवरील चालकाचा दुचाकीवरील ताेेल सुटला.
बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली सापडला तरुण
बाईकचे संतुलन बिघडल्यामुळे दुचाकीस्वार आणि मागे बसलेला सैफुल वैद्य हे बाजूनेच जाणाऱ्या एका बेस्ट बसवर जाऊन धडकले. या धडकेनंतर मागे बसलेला सैफुल वैद्य थेट बसच्या मागच्या चाकाखाली फेकला गेला. अपघात झाल्यानंतर बसचालकाने तात्काळ बस थांबवली, मात्र तोपर्यंत सैफुल बसच्या खाली अडकला होता. बस थोडी मागे हटवून त्याला तात्काळ उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सध्या मालवणी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्हीच्या आधारे नेमकी कुणाची चूक होती, याचा शोध घेतला जात आहे.






